मोदींनी पेगासस घेण्यासाठी करदात्यांचा पैसा वापरला ; आव्हाडांचा घणाघात

देशातील टॅक्सपेयर लोकांचा एवढा पैसा मोदी सरकारने पेगासस हे राजकीय हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर घेण्यासाठी वापरला आहे, असे न्यूयॉर्क टाइम्सचा रिपोर्ट आहे,” असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
jitendra awhad,Narendra Modi
jitendra awhad,Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

मुंबई: न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तामुळे पेगासस हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. विरोधी पक्षाने या पेगासस वरुन आता भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर टीका केल्यानतर आता राष्ट्रवादीचे नेते, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी मोदी सरकारवर (Modi government) हल्लाबोल केला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी टि्वट करीत मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “१ बिलियन डॉलर म्हणजे ७५०० करोड. २ बिलियन डॉलर म्हणजे १५ हजार करोड. इतक्यासाठी सांगतोय की, देशातील टॅक्सपेयर लोकांचा एवढा पैसा मोदी सरकारने पेगासस हे राजकीय हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर घेण्यासाठी वापरला आहे, असे न्यूयॉर्क टाइम्सचा रिपोर्ट आहे,” असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

न्यूयॉर्क टाईम्सने (New York Times Pegasus news )केलेल्या दाव्यानुसार २०१७ मध्ये मोदी सरकारने संरक्षण सौद्याच्या पॅकेजमध्ये इस्त्रायलकडून पेगासस खरेदी केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मार्च २०२० मध्ये राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अशा प्रकारचे तंत्रज्ञान खरेदी केल्याची माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे उपलब्ध नसल्याचे उत्तर त्या खात्याच्या मंत्र्यांनी दिले होते.

jitendra awhad,Narendra Modi
गोवा विधानसभेसाठी ५८७ अर्ज दाखल

इस्त्रायली कंपनी, एनएसओ ग्रुपच्या पेगासस स्पायवेअरने भारतातील 300 हून अधिक मोबाईल नंबरला लक्ष्य केले, ज्यामध्ये सध्याच्या सरकारचे दोन मंत्री, तीन विरोधी नेते, एक न्यायाधीश, अनेक पत्रकार आणि बरेच व्यापारी यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. न्यूर्याक टाईन्सने याबाबत वृ्त्त आज दिले आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत म्हणाले, 'पेगाससच्या विरोधामध्ये आम्ही सातत्याने पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारत आहोत. गेल्या अधिवेशानात मोदी सरकारनं (Modi government) या विषयावर संसद चालू दिली नाही. आम्हाला बोलू दिले नाही. आता न्यूयॉर्क टाइम्सच्या या वृत्तानंतर सत्य समोर आले आहे. आमच्या सारख्या हजारो लोकांचे फोन हे पाळती खाली आहेत. आमच्या बँक खात्याच्या व्यवहारांची माहिती देखील घेतली जात आहे,'' ''आणीबाणीपेक्षा ही भयंकर परिस्थिती सध्या आपल्या देशांमध्ये आहे. त्यामुळे लोकशाही कुठे आहे, असा प्रश्न पडला आहे. भारतीय जनता पक्षाच्या देखील प्रमुख नेत्यांवर पाळत ठेवली आहे. मोदी यावर बोलतील का,'' असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com