Gaurav Gogoi On PM Narendra Modi: अविश्वास प्रस्ताव आणण्यामागे विरोधकांचा उद्देश काय होता; खासदार गौरव गोगोईंनी सांगितले कारण

No Confidence Motion: मोदी-विरोधकांच्या भाषणबाजीने दिल्लीतले राजकारण तापले
Gaurav Gogoi
Gaurav Gogoi Sarkarnama

New Delhi : मणिपूरचा मुद्दा तापवून विरोधकांनी अधिवेशनात छाप टाकली. विरोधी बाकांवरच्या अनेक नेत्यांनी मोदी-शाहांना अंगावर घेतले. विरोधकांच्या आरोपांना जशास तसे उत्तरे देऊन सत्ताधारी पक्षाच्या अनेकांनी विरोधकांना रोखले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार भाषण ठोकून विरोधकांना सडकून काढले. मात्र, पहिल्या दीड तासांत मोदी मणिपूरवर न बोलल्याने विरोधक सभागृहाबाहेर निघून गेले.

सभागृहातून पाय काढताच विरोधकांनी माध्यमांपुढे जाऊन मोदी पळवाट काढत असल्याचा आरोप केला. एकीकडे संसदेत मोदी मणिपूरवर बोलत असताना विरोधी नेते, मात्र, माध्यमांपुढे जाऊन मोदींविरोधात नाराजीचा सूर मांडत राहिले. परिणामी, मोदी-विरोधकांच्या भाषणबाजीने राजधानीतील राजकारण गरम झाले. त्यात, काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरींचे निलंबन करीत, भाजपने काँग्रेसचा बदलाच घेतला.

Gaurav Gogoi
PM Narendra Modi In Loksabha : पहिल्या दीड तासांच्या भाषणात मोदी मणिपूरवर काहीच न बोलल्याने विरोधकांचा सभात्याग

या सर्व घडामोडींवर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी भाष्य करत विरोधकांच्यावतीने सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचे कारण सांगत सरकारला सवालही केले.

"मोदी सरकारच्या विरोधात 'इंडिया'आघाडीच्यावतीने हा अविश्वास ठराव आणण्याचे कारण होते, मणिपूरमध्ये झालेल्या घटनांना न्याय मिळाला पाहिजे. देशाच्या संसदेला वाचवण्यासाठी आणि पंतप्रधान मोदी यावर संसदेत बोलावे, यासाठी हा प्रस्ताव आणला होता", असे खासदार गौरव गोगोई यांनी सांगितले.

Gaurav Gogoi
Gaurav Gogoi Political Journey : मणिपूर हिंसाचारावरून मोदींना खिंडीत गाठलेले गौरव गोगोई कोण ? कसा आहे त्यांचा राजकीय प्रवास

"अविश्वास प्रस्ताव आणण्यामागे आमचा दुसरा उद्देश साध्य झाला असून जर आम्ही हा प्रस्तावर आणला नसता तर पंतप्रधान आजही विदेशात भाषण देण्यासाठी गेले असते. पण पंतप्रधान मोदी आत्ता देखील त्यांच्या कर्तव्यापासून दूर जात आहेत", असा आरोपही गौरव गोगोईंनी मोदींवर केला.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com