Rahul Gandhi : राहुल गांधींना पुन्हा चढावी लागणार कोर्टाची पायरी; अमित शाहांबद्दल केलेलं वक्तव्य भोवणार ?

MP-MLA Court - Rahul Gandhi : राहुल गांधींना न्यायालयाने नोटीस बजावली, 16 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल पाच वर्षांपूर्वी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीसंदर्भात आता सुलतानपूर येथील न्यायालयाने राहुल गांधींना नोटीस बजावली असून, 16 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

अमित शाह यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर 2018 मध्ये मानहानीचा खटला दाखल झाला होता. सुलतानपूर येथील भाजपचे तत्कालीन जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Gandhi
Sachin Pilot : काँग्रेसचं सरकार सत्तेत येण्यापूर्वीच राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावरून पायलटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

नेमकं प्रकरण काय ?

राहुल गांधी यांनी बंगळुरूमध्ये 8 मे 2018 ला घेतलेल्या पत्रकार परिषदेत तत्कालीन भाजपचे अध्यक्ष अमित शाहांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप गांधी यांच्यावर करण्यात आलेला आहे. राहुल गांधींनी शाहांना खुनाचा आरोपी ठरवत त्यांची बदनामी केल्याचं म्हणणं याचिकाकर्ते विजय मिश्रा यांचं आहे.

त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात याचिका दाखल करत खटला चालवण्याची मागणी केली होती. या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली असून, आता पुढील सुनावणीला (16 डिसेंबर) हजर राहण्यासाठी राहुल गांधींना समन्स बजावले आहेत. त्यामुळे राहुल गांधींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून राहुल गांधी अडचणीत आले होते. त्यांना गुजरातच्या सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना दिलासा दिला होता. त्यानंतर आता राहुल गांधींना पाच वर्षांपूर्वी अमित शाहांबद्दल केलेलं वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Rahul Gandhi
Telangana Election : निवडणूक तेलंगणामध्ये अन् आयोगाचा कर्नाटकमधील काँग्रेस सरकारला दणका, नेमकं काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com