Sanjay Raut ON Manipur Violence : मणिपूर जळत असताना मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर ; राऊतांचा घणाघात

Manipur Violence News : नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक व्हायला हवी होती.
Manipur Violence  News update
Manipur Violence News update Sarkarnama
Published on
Updated on

Manipur Violence : गेल्या दोन महिन्याभरापासून मणिपूर या ईशान्येकडच्या राज्यात संघर्ष पेटला आहे. मोदी सरकारला येथे नियंत्रण आणण्यास अपयश आले आहे.

मणिपूर येथे हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मणिपुरच्या हिंसाचारावर मौन बाळगले असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.

Manipur Violence  News update
BRS Entry in Maharashtra Politics : मोठी बातमी : BRS ने महाराष्ट्रात खातं उघडलं ; मराठवाड्यात..

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी यावरुन मोदी सरकारवर घणाघात केला आहे. ते शनिवारी माध्यमांशी बोलत होते. मणिपूर हिंचारावरुन राऊतांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. मणिपूर जळत असताना मोदी अमेरिकेच्या दौऱ्यात व्यग्र असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.

राऊत म्हणाले, "मणिपूर मधील हिंसाचार थांबवण्यासाठी सरकारमध्ये हिंमत नाही. मणिपूरमध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मणिपूर हिंसाचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने सर्व पक्षीय बैठक बोलण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक व्हायला हवी होती," शिवसेनेच्या वतीने खासदार प्रियंका चतुर्वेदी त्रिवेदी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे राऊतांनी सांगितले.

Manipur Violence  News update
Patna Opposition Meeting : मोदींचा विजयाचा वारु रोखण्यासाठी विरोधकांनी ठरवली ही रणनीती..

शुक्रवारी पाटण्यात विरोधी पक्षाची बैठक झाली. या बैठकीला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसले होते. यावरुन भाजपने ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्याला राऊतांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

"आमच्यावर सडकून टीका करण्याआधी स्वतःकडे बघा," असा सल्ला राऊत यांनी दिला. मुफ्ती यांच्यासोबत भाजपने सरकार स्थापन केले होते, नवाब शरीफ यांचा केक कापण्यासाठी आम्ही गेलो नव्हतो, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

विरोधी पक्षाच्या बैठकीबाबत राऊतांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, "या बैठकीत मोदींच्या विरोधात एकत्र लढण्याचा निर्णय सर्व पक्षांनी घेतला आहे. 2024 मध्ये लोकशाहीतील सर्वात शेवटची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत जर भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला नाही, तर आगामी काळात भारतात लोकशाही टिकणार नाही,"

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com