Hit and Run : आंध्र प्रदेशात खासदाराच्या मुलीने भरधाव कारने चिरडल्याने एकाचा मृत्यू ; काही तासांतच जामीनही मिळाला!

Hit and Run Case in Andhra Pradesh : अपघातानंतर मुलगी घटनास्थळावरून पसार झाली होती, मात्र पोलिसांनी माग काढत केली होती अटक
Hit and Run : आंध्र प्रदेशात खासदाराच्या मुलीने भरधाव कारने चिरडल्याने एकाचा मृत्यू ; काही तासांतच जामीनही मिळाला!
Sarkarnama

Andhra Pradesh MPs daughter Hit and Run Case :आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाच्या खासदाराच्या मुलीने कारने चिरडल्याने एका मद्यपीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर खासदाराची मुलगी घटनास्थळावरून पळून गेली होती.

त्यानंतर, तिला पोलिसांनी शोधून अटक केली गेली. मात्र, काही वेळातच तिला पोलीस ठाण्यातूनच जामीन मिळाल्याने, याची सर्वत्र चर्चा होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वायएसआर काँग्रेस खासदार बिदा मस्तान राव यांची मुलगी माधुरी आहे. माधुरीच्या कारने बेसंत नगर भागात रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका मद्यधुंद व्यक्तीला चिरडले, परिणामी त्याचा मृत्यू झाला.

Hit and Run : आंध्र प्रदेशात खासदाराच्या मुलीने भरधाव कारने चिरडल्याने एकाचा मृत्यू ; काही तासांतच जामीनही मिळाला!
Prashant Kishor : यावेळी लिहून देतो बिहारमध्ये कोणाची सत्ता, प्रशांत किशोरांनी दिले चॅलेंज

या अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तीचे नाव सूर्या असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी संध्याकाळी सूर्या मद्यधुंद अवस्थेत चेन्नईच्या बेसंत नगर भागात फूटपाथजवळ रस्त्याच्या कडेला पडून होता.

दरम्यान माधुरी आणि तिची मैत्रीण प्रवास करत असलेली भरधाव कार त्याच्या अंगावरून गेली. टायगर वरदचारी फर्स्ट क्रॉस स्ट्रीटकडे वळल्यानंतर हा मद्यधुंद अवस्थेतील रस्त्यावर पडलेला व्यक्ती त्यांना दिसला नाही, असा आरोपींचा दावा आहे.

Hit and Run : आंध्र प्रदेशात खासदाराच्या मुलीने भरधाव कारने चिरडल्याने एकाचा मृत्यू ; काही तासांतच जामीनही मिळाला!
Rahul Gandhi : 'एनडीएचे लोक I.N.D.I.A च्या संपर्कात, भाजपच्या मित्र पक्षात असंतोष'

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये माधुरीची मैत्रीण स्थानिक लोकांशी वाद घालताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती असे म्हणताना ऐकू येते की त्यांनी सूर्याला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली आहे. रुग्णवाहिकेला फोन केल्यानंतर स्थानिक लोकांच्या संतापामुळे त्या घटनास्थळावरून निघून गेल्याचे आरोपींचे म्हणणे आहे.

दरम्यान चेन्नई पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी खासदाराची मुलगी आणि तिच्या मैत्रिणीचा ज्या क्रमांकावरून रुग्णवाहिका मागवली होती त्याचा माग काढला. कारची नोंदणी पुद्दुचेरीमध्ये झाल्याचेही समोर आले आहे. मृत सूर्याची पत्नी विनीता हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com