सर्व पिकांना MSP, मोफत शिक्षण आणि लॅपटॉप; समाजवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

उत्तर प्रदेश (Uttar pradesh) विधानसभा निवडणुक 2022 (UP election 2022) साठी आज (8 फेब्रुवारी) भाजप पाठोपाठ समाजवादी पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.
up election 2022 Samajwadi Party manifesto released
up election 2022 Samajwadi Party manifesto released
Published on
Updated on

लखनौ : उत्तर प्रदेश (Uttar pradesh) विधानसभा निवडणुक 2022 (UP election 2022) साठी आज (8 फेब्रुवारी) भाजप पाठोपाठ समाजवादी पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) 'समाजवादी वचन पत्र' नावाने घोषणापत्राचे प्रसिद्ध केले. ज्यामध्ये प्रत्येक वर्गासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. समाजवादी पक्षाने सर्व पिकांवर एमएसपी देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोफत वीज आणि मुलींना केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण देण्याची घोषणा या घोषणा पत्रात करण्यात आली आहे.

जाहीरनाम्याला 'समाजवादी वचन पत्र' असे नाव देण्यात आले असून त्याची टॅग लाइन - 'सत्य वचन, अटूट वचन' ठेवण्यात आली आहे. 'सत्यवचन, अप्राप्य वादा' या दस्तावेजासह आम्ही २०२२ च्या जाहीरनाम्याच्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहचणार आहोत. जाहीरनाम्यानुसार मनरेगाच्या धर्तीवर नागरी रोजगार हमी कायदा करण्यात येणार आहे. यासह सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

up election 2022 Samajwadi Party manifesto released
मुलींसाठी स्कूटी, सरकारी नोकरी; भाजपच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 15 दिवसांत पैसे, 4 वर्षांत कर्जमुक्ती

सर्व पिकांसाठी एमएसपी दिला जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १५ दिवसांत पैसे दिले जातील. यामुळे ४ वर्षात सर्व शेतकरी कर्जमुक्त होणार आहेत. सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज, बिनव्याजी कर्ज दिले जाईल. समाजवादी पेन्शन अंतर्गत महिला, वृद्ध आणि दिव्यांगांना दरवर्षी 18 हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे. जर समाजवादीचे सरकार स्थापन झाले तर सर्व गावे आणि शहरांवर सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे लक्ष ठेवून सुरक्षा सुनिश्चित करणार असल्याची घोषणाही या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.

प्रत्येक गावात आणि शहरात वाय-फाय सुविधा देणार

त्याचबरोबर सर्व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक गावात आणि शहरात वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले आहे. समाजवादीचे सरकार आल्यानंतर राज्यात समाजवादी उपहारगृहे सुरू करण्यात येईल, ज्यामध्ये 10 रुपयांत जेवण दिले जाईल. प्रत्येक जिल्ह्यात मॉडेल हॉस्पिटल बांधण्यात येणार आहे. बीपीएल कार्डधारकांना वर्षभरात दोन सिलिंडर मोफत दिले जाणार असल्याचेही या जाहीरनाम्यात सांगण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com