ST Accident : आठ जणांची ओळख पटली; चौघे जळगावचे, चालक-वाहकाचा मृत्यू

बसमध्ये सुमारे 40 प्रवासी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Conductor Prakash Chaudhary, Driver Chandrakant Patil
Conductor Prakash Chaudhary, Driver Chandrakant PatilSarkarnama

पुणे : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) धार जिल्ह्यात एसटी बस (MSRTC) पुलावरून नर्मदा नदीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील आठ जणांची ओळख पटली असून मृतांमध्ये बसचे चालक व वाहकाचाही समावेश आहेत. या दोघांसह चौघे जण अंमळनेरमधील एक महिला मुर्तिजापूर येथील रहिवासी आहे. (MSRTC Accident News)

पुलावर विरूध्द दिशेने आलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटून बस नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे.

Conductor Prakash Chaudhary, Driver Chandrakant Patil
एकामागोमाग एक झटके बसल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिंदे-फडणवीसांकडे धाव

अपघातामध्ये बसचे चालक चंद्रकांत एकनाथ पाटील आणि वाहक प्रकाश चौधरी यांचा मृत्यू झाला आहे. तसेच निंबादी आनंद पाटील आणि कमलाबाई पाटील यांचाही मृत्यू झाला असून चौघ जण अमळनेरमधील आहेत. मृत्यू झालेल्यांपैकी अरवा मूर्तजा बोरा या अकोल्यातील आहेत. तर दोघे जण राजस्थान आणि एक जण इंदूरमधील आहेत.

एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेली माहितीनुसार, ही बस जळगांव जिल्हयातील अमळनेर आगाराची होती. इंदूर येथून सकाळी साडे सात वाजता बस सुटली. अमळनेरही ही बस निघालेली असताना नर्मदा नदीवर बसला अपघात झाला. त्यानंतर पुलाचा कठडा तोडून ही बस नदीत कोसळली.

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, धार जिल्हा प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत तेरा जणांचे मृतदेह हाती लागले आहे. बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील किती प्रवासी होते, याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही.

एसटी अपघातातील या दहा जणांची पटली ओळख -

1) चालक - चंद्रकांत एकनाथ पाटील (वय- 45, अमळनेर)

2) वाहक - प्रकाश चौधरी (वय- 40, अमळनेर)

3) निंबाजी आनंदा पाटील (वय- 60, अमळनेर)

4) कमलाबाई निंबाजी पाटील (वय 55, अमळनेर)

5) चेतन गोपाल जांगिड (जयपुर, राजस्थान)

6) जगन्नाथ हेमराज जोशी (वय 70, उदयपुर, राजस्थान)

7) सैफुद्दीन अब्बास नूरानी (इंदूर)

8) अरवा मूर्तजा बोरा (वय 27, मूर्तिजापूर, अकोला)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com