Mehul Choksi : मेहुल चोक्सीला न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला; बँकेने फ्लॅट अन् बंगला घेतला ताब्यात

PNB Scam News : आयसीआयसीआय बँकेने मागवलेल्या मालमत्ता चोक्सीच्या मालकीच्या नसून कंपन्यांच्या मालकीच्या असल्याचे विशेष न्यायाधीश मेंजोगे यांनी स्पष्ट केले.
Mehul Choksi
Mehul Choksi Sarkarnama
Published on
Updated on

PNB Fraud Case : पंजाब नॅशनल बँक (PNB Scam) गैरव्यवहारातील आरोपी हिऱ्यांचा व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. चोक्सीने दाखल केलेली हस्तक्षेप याचिका मुंबईतील विशेष न्यायालयाने फेटाळली. (Choksi’s intervention plea in ICICI’s petition junked)

पीएनबी घोटाळ्याच्या तपासादरम्यान सक्तवसुली संचालनालयाने जप्त केलेल्या दोन मालमत्ता ताब्यात घेण्याची परवानगी मिळावी, यासाठी आयसीआयसीआय बँकेने दाखल केलेल्या अर्जावर न्यायालयाने सुनावणी केली.

या मालमत्तांची किंमत ६३६ कोटी रुपये आहे. 13 हजार कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्याच्या तपासामुळे चोक्सी फरार असून, तो अँटिग्वामध्ये लपून बसला आहे, अशी माहिती भारत सरकारने न्यायालयाला दिली.

वाळकेश्वर रोडवरील गोकुळ बिल्डिंगच्या दहाव्या मजल्यावर फ्लॅट आणि अलिबाग तालुक्यातील किहीममधील बामणसुरे गावात घर क्रमांक ५३६ वर आपली सदनिका असल्याचा दावा चोक्सीने केला होता.

चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी युक्तिवाद केला होता की, तो मालमत्तेचा मालक असल्याने न्यायालय त्याचे म्हणणे ऐकल्याशिवाय प्रॉपर्टी बँक पूर्ववत करू शकत नाही, असा युक्तिवाद त्यांचे वकील विजय अग्रवाल यांनी केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mehul Choksi
Thackeray Group: ठाकरेंनी फुटीरांविरुद्ध रान पेटवले, मात्र 'टेम्पो' टिकवण्याचे आव्हान...

आयसीआयसीआय बँकेने चोक्सीच्या हस्तक्षेपाला विरोध केला आहे. आयसीआयसीआय बँकेने मागवलेल्या मालमत्ता मेहुल चोक्सीच्या मालकीच्या नसून कंपन्यांच्या मालकीच्या असल्याचे विशेष न्यायाधीश एस. एम. मेंजोगे यांनी स्पष्ट केले.

चोक्सीची पत्नी प्रीती कोठारीने केंद्रीय तपास यंत्रणा ईडीबद्दल न्यायालयात तक्रार केली आहे आणि म्हटले आहे की, केंद्रीय एजन्सीला माहीत होते, की ती तिच्या पतीसह अँटिग्वा येथे खूप आधी शिफ्ट झाली होती; परंतु तरीही त्याने त्याच्या मुंबईतील निवासस्थानी समन्स पाठविण्याचा निर्णय घेतला.

मेहुल चोक्सीची पत्नी भारतात परतण्यास नकार देत असून, तिच्याविरोधात कायमस्वरूपी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुरू केलेल्या कारवाईत सहभागी न झाल्याने जारी केलेले वॉरंट रद्द करण्याची मागणी प्रीतीने न्यायालयात केली आहे.

मालमत्ता कंपन्यांची : न्यायालयाचे निरीक्षण

एन अँड जे फिनस्टॉक प्रायव्हेट लिमिटेड, रोहन मर्कन्टाइल प्रायव्हेट लिमिटेड, गीतांजली इन्फ्राटेक लिमिटेड आणि हैदराबाद जेम्स सेझ लिमिटेड या दोन्ही मालमत्ता आरोपींच्या मालकीच्या नाहीत.

त्यामुळे मेहुल चोक्सीच्या याचिकेत त्याला कामकाजात हस्तक्षेप करण्याची परवानगी देण्यासाठी कोणतेही कायदेशीर बळ मला दिसत नाही. असे निरीक्षण नोंदवत हा अर्ज न्यायालयाने फेटाळला.

Mehul Choksi
Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा; राऊत संतापले, ते स्वतःला 'हिंदुहृदयसम्राट' म्हणून घेतात ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com