कोहिमा : नागालँडच्या (Nagaland) राजकारणात मध्यरात्री मोठ्या घडामोडी घडल्या असून रातोरात तब्बल २१ आमदारांनी नागा पीपल्स फ्रंटला (Naga People's Front) राम-राम केला आहे. या सर्व आमदारांनी मुख्यमंत्री नेफ्यू रियो (Neiphiu Rio) यांच्या उपस्थितीमध्ये नॅशनल डेमोक्रेटीक प्रोग्रेसिव्ह पक्षात (Nationalist Democratic Progressive Party) प्रवेश केला आहे. एनडीपीपीचे प्रवक्ते एम. आर. जमीर. यांनी यानंतर बोलताना सांगितले की, एनपीएफच्या या आमदारांच्या पक्षांतरानंतर ६० सदस्यीय विधानसभेमध्ये आता आमच्याकडे ४२ आमदार झाले आहे. यापूर्वी ही संख्या २५ होती.
विधानसभेतील संख्याबळानुसार आता नागा पीपल्स फ्रंटचे ४ आमदार आहेत. तर भाजपचे १२ आणि २ अपक्ष आमदार आहेत. वैशिष्ट्य म्हणजे हे सर्वच आमदार सरकारमध्ये सहभागी असून एकही आमदार विरोधी पक्षात नाही. एनपीएफ मागील वर्षी ऑगस्टमध्ये एनडीपीपी आणि भाजपप्रणीत सत्तेत सहभागी झाला आहे. त्यानंतर आता राज्यात पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत, आणि अवघ्या काही तासांपूर्वीच एनपीएफने या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे घोषित केले आहे.
नागालँड विधानसभेचे अध्यक्ष शेरिंगेन लाँगकुमार म्हणाले, त्यांना एनपीएफच्या विधिमंडळ पक्षाच्या २१ सदस्यांचे एनडीपीपीमध्ये विलीनीकरण करण्याचा दावा प्राप्त झाला असून हा निर्णय आपण मान्य केला आहे. एनडीएफ पक्षाचे ५ आमदार नागालँडशिवाय मणिपूरमध्येही ५ आमदार असून ते भाजपसह सत्तेत सहभागी आहेत. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये १२ पैकी २ मंत्री एनडीएफ पक्षाचे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.