'शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख' : नरेंद्र मोदी

बाबासाहेब पुरंदरेच्या (Babasaheb Purandare) निधनामुळे इतिहास आणि संस्कृतिक क्षेत्रात कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे
Babasaheb purandare - PM Narendra Modi
Babasaheb purandare - PM Narendra Modi
Published on
Updated on

नवी दिल्ली : शिवशाहीर, शिवचरित्र्यकार अशी साऱ्या महाराष्ट्राला ओळख असलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचे आज पहाटे पाच वाजून 10 मिनिटांनी (ता.१५) पुण्यात एका खासगी रूग्णालयात वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपुर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

''शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख मला झालं आहे. बाबासाहेब पुरंदरेच्या निधनामुळे इतिहास आणि संस्कृतिक क्षेत्रात कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यामुळेच भविष्यातील पिढ्या छत्रपती शिवाजी महारांजांशी जोडलेल्या राहतील. त्यांनी केलेली इतर कामही कायमच स्मरणात राहतील,'' असे म्हणत त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांनी याच वर्षी वयाची ९९ वर्षे पुर्ण करत १०० व्या वर्षात पदार्पण केलं. २९ जुलै रोजी पुण्यात त्यांच्या निवासस्थानी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांना वाढदिवसानिमित्त माध्यमातून मराठीमधून शुभेच्छा दिल्या होत्या. '' बाबासाहेब पुरंदरेंची शिवाजी महाराजांबद्दल इतकी भक्ती उगाच नाही. शिवाजी महाराज भारताच्या इतिहासाचे शिखर पुरुष आहेतच. पण भारताचा वर्तमान आणि भूगोलही त्यांच्या अमर गाथांनी प्रभावित आहे”, असंही पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलं.

बासाहेब पुरंदरे यांना २०१५ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केलं तर २०१९ मध्ये केंद्रसरकारने पद्मविभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारनेही बाबासाहेब पुरंदरेंना कालिदास पुरस्काराने सन्मानित केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com