Narendra Modi : "किचड उनके पास था, मेरे पास.." ; टीका करताना मोदींचा शायराना अंदाज!

Narendra Modi : जेवढा चिखल तुम्ही टाकाल तेवढे कमळ फुलणार हेच खरे आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले आहे. आज पुन्हा त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. राज्यसभेत गदारोळ सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरू झाले. यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोदी-अदानी भाई भाईच्या घोषणा दिल्या. एवढ्या महत्त्वाच्या सभागृहातील काही लोकांची भाषा केवळ सभागृहाचीच नव्हे तर देशाची निराशा करणारी आहे, हे दुर्दैवी असल्याची टीका मोदींनी केली.

मोदी म्हणाले की, "काल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे तक्रार करत होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार माझ्या भागात येतात. मात्र माझं त्यांना उत्तर आहे की, कर्नाटकात 1 कोटी 70 लाख जनधन खाती उघडली आहेत. त्यांच्या भागामध्ये 8 लाखांहून अधिक खाती उघडली गेली आहेत."

Narendra Modi
PM Narendra Modi : भाजपच्या खासदारांना व्हीप ; '13 फेब्रुवारीपर्यंत.."

सभागृहात गोंधळ सुरू असतानाच मोदी भाषण करत राहिले. मोदी म्हणाले, "सर्वांना बँकेत प्रवेश मिळेल असे सांगत बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. मात्र निम्मी जनता बँकांच्या दारापर्यंत पोहोचू शकली नाही. मात्र आम्ही जनधनच्या माध्यमातून गरिबांना बँकांशी जोडले. गेल्या 9 वर्षात आम्ही 48 कोटी लोकांना जन धन खात्याशी जोडले आहे."

विरोधकांच्या या गदारोळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांची खिल्ली उडवली. मोदी म्हणाले,"कीचड़ उसके पास था, मेरे पास गुलाल, जो भी जिसके पास था, उसने दिया उछाल," असं शायरीमधून प्रत्युत्तर दिले. "जेवढा चिखल तुम्ही टाकाल तेवढे कमळ फुलणार हे खरे आहे. तुम्ही लोकांनी कमळ फुलवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो, असे मोदी म्हणाले.

Narendra Modi
Budget Session 2023 : 'मोदी-अदानी भाई-भाई'चा विरोधकांचा नारा

"महिला सर्वांगीण विकासासाठी आमच्या सरकारने खूप काही केले आहे. शौचालये बांधल्याने त्यांचा विकास होईल का, असा प्रश्न आमच्या एका सदस्याने विचारला. कदाचित एवढ्यावरच त्याचं लक्ष गेलं असेल होतं. मला अभिमान आहे की, 11 कोटी शौचालये बांधून आम्ही आमच्या माता-भगिनींना सन्मान दिला आहे," असे ही मोदी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com