Narendra Modi : बिहार निवडणुकीआधी मोदींचा मास्टरस्ट्रोक; 62 हजार कोटींच्या योजनांची घोषणा

Modi government development projects : शनिवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात सकाळी 11 वाजता आयोजित कार्यक्रमात विविध योजनांचा आराखडा जाहीर केला.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील युवकांना लक्षात घेऊन सुमारे 62 हजार कोटी रुपये खर्चाच्या योजना जाहीर केल्या आहेत. शनिवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात सकाळी 11 वाजता आयोजित कार्यक्रमात विविध योजनांचा आराखडा जाहीर केला.

या योजनेत पीएम-सेतु योजना विशेष ठिकाणी आहे. या योजनेअंतर्गत 1000 सरकारी आयटीआय संस्थांना हब-एंड-स्पोक मॉडेलमध्ये अपग्रेड केले जाणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात पटना आणि दरभंगा येथील आयटीआयवर विशेष भर दिला जाणार आहे. हा केंद्रीय प्रकल्पात 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

यासोबतच, पंतप्रधानांनी 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 400 नवोदय विद्यालये आणि 200 एकलव्य मॉडेल आवासीय विद्यालयांमध्ये 1,200 वॉकेशनल स्किल लॅब्स सुरू करण्याची घोषणा केली. बिहारमध्ये या योजनेत विशेष भर देण्यात येईल, ज्यामुळे युवकांना आधुनिक कौशल्य शिकण्याची संधी मिळेल.

Narendra Modi
Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूच राजकारण : उद्धव ठाकरेंनी 48 तासानंतर चुप्पी तोडली; कदमांना शिवसेना स्टाईल प्रत्युत्तर

मोदी यांनी बिहारमधील मुख्यमंत्री निश्चय स्वयं सहायता भत्ता योजना देखील सुरू केली. या योजनेअंतर्गत 5 लाख बेरोजगार युवकांना दोन वर्षांसाठी दरमहा 1000 रुपये भत्ता आणि मोफत कौशल्य प्रशिक्षण मिळणार आहे.

याशिवाय त्यांनी बिहार स्टुडंट क्रेडिट कार्ड योजना देखील पुन्हा सुरू केली आहे. या योजनेत 4 लाख रुपये पर्यंतचे पूर्णपणे व्याजमुक्त शैक्षणिक कर्ज विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. याआधी 3.92 लाख विद्यार्थ्यांनी 7,880 कोटी रुपयांहून अधिक कर्ज घेतले आहे.

Narendra Modi
Congress vs BJP Maharashtra politics : फडणवीसांशी मैत्री, गडकरींविरोधात लढले... भाजप प्रवेशाच्या चर्चांवर काँग्रेस आमदाराने ठासून सांगितले

पंतप्रधानांनी बिहार युवा आयोगाचे उद्घाटन केले, जे 18 ते 45 वयोगटातील युवकांसाठी तयार केलेले आहे. तसेच, जन नायक कर्पूरी ठाकुर कौशल्य विश्वविद्यालय आणि अन्य महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक व संशोधन सुविधा सुरू करण्याचीही घोषणा यावेळी केली.

याशिवाय, 160 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतून 27,000 हून अधिक विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण, प्रयोगशाळा आणि छात्रावास सुविधांचा लाभ मिळेल. त्यांनी एनआयटी पटना, बिहटा परिसर देखील उद्घाटन केले. या सर्व योजनांमुळे बिहारमधील युवकांना रोजगार, कौशल्य विकास आणि शिक्षणाच्या क्षेत्रात मोठा हातभार मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com