Rajasthan News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज राजस्थानमधील पुष्कर या ठिकाणी सभा पार पडली. 6 एप्रिल हा दिवस भारतीय जनता पक्ष स्थापना दिवस आहे. योगायोग पाहा आजच मला पुष्कर परिसरात येण्याचे भाग्य लाभले. नव्या भारताच्या उभारणीसाठी भाजप कटिबद्ध आहे 2024 च्या निवडणुकाही देशाचे भवितव्य ठरवणार आहेत, असे मोदी या वेळी म्हणाले. तसेच त्यांनी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यावरही सडकून टीका केली. काँग्रेसचा जाहीरनामा हा मुस्लिम लीगचा विचार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (Lok Sabha Election 2024)
पंतप्रधान मोदी म्हणाले, देशात पहिली काही दशके फसवणूक करणारी सरकारे चालली. यात काही पक्षांच्या मजबुरीमुळे आणि स्वार्थामुळे राष्ट्रहित मागे पडले. काँग्रेसच्या राजवटीत गाव, गरीब, शेतकरी, मजूर, तरुण, महिला, सर्वांचे जगणे कठीण झाले होते. घोटाळे आणि दहशतवादी हल्ल्यांच्या बातम्या दररोज येतच होत्या. 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर देशात मोठे बदल घडण्यास सुरुवात झाली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान मोदी (Narendra Modi) म्हणाले की, काँग्रेस जिथे असते तिथे विकास होऊ शकत नाही. काँग्रेसने कधीही वंचित, शोषित, तरुणांचा विचार केला नाही आणि गरिबांचाही विचार केला नाही. काँग्रेस हा केवळ घराणेशाही करणारा आणि भ्रष्टचारात बुडालेला पक्ष आहे. काँग्रेसचा जाहीरनामा हा मुस्लिम लीगचा विचार आहे, असा घणाघात मोदींनी केला.
मोदी म्हणाले, काँग्रेसने (Congress) काल आपला जाहीरनामा जारी केला, हा जाहीरनामा खोटारडा आहे. काँग्रेसच्या या जाहीरनाम्याच्या प्रत्येक पानावर देशाचे तुकडे करण्याचा विचार दिसतो. मुस्लिम लीगची विचारसरणी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसून येते. काँग्रेसला मुस्लिम लीगचे विचार देशावर लादायचे आहेत. काँग्रेसकडे ना तत्त्वे उरली आहेत ना धोरणे, हे या जाहीरनाम्यातून स्पष्ट झाले आहे, असे मोदी म्हणाले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.