Narendra Modi At Jharkhand : '...असे लोक झारखंडचा विकास कधीच करणार नाहीत, मोदींचा JMM -काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

Narendra Modi Jharkhand News : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचे झारखंडलामध्ये 'रोड शो'चे आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी यांची बोकारो येथील चंदनकियारी येथे सभा झाली.
Narendra Modi Jharkhand News
Narendra Modi Jharkhand News Sarkarnama
Published on
Updated on

झारखंड विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात प्रचारसभांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचे झारखंडलामध्ये 'रोड शो'चे आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी यांची बोकारो येथील चंदनकियारी येथे सभा झाली. अशात आज पुन्हा एकदा रोटी-बेटी-माटी रक्षणाचा नारा दिला. भाजप-एनडीएचा इथे एकच मंत्र आहे. आम्ही झारखंड निर्माण केले आहे, आम्ही झारखंड सुधारू. जे झारखंड राज्याच्या निर्मितीच्या विरोधात आहेत. असे लोक झारखंडचा विकास कधीच करणार नाहीत, असेही मोदी यावेळी म्हणाले.

10 वर्षांपूर्वी 2004 ते 2014 पर्यंत केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, सोनिया गांधी यांनी सरकार चालवले आणि मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. त्यावेळी केंद्र सरकारने 10 वर्षांत मोठ्या कष्टाने झारखंडला 80 हजार कोटी रुपये दिले होते. 2014 नंतर दिल्लीत सरकार बदलले, तुम्ही मोदींना सेवेची संधी दिली आणि गेल्या 10 वर्षात आम्ही झारखंडला 3 लाख कोटी रुपयांहून अधिक निधी दिला. गरिबांना कायमस्वरूपी घरे मिळावीत, शहरे आणि खेड्यांमध्ये चांगले रस्ते व्हावेत, वीज आणि पाणी, उपचार सुविधा, शिक्षणाच्या सुविधा, सिंचनासाठी पाणी, वृद्धापकाळात औषधे मिळावीत, अशी भाजपची इच्छा होती, पण गेल्या 5 वर्षात झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारने, तुमच्या हक्काच्या या सुविधा लुटल्या.

Narendra Modi Jharkhand News
Hemant Soren : 'ना बंटे हैं, ना बटेंगे...' हेमंत सोरेन यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; झारखंडमध्ये पराभव होणारच!

'भ्रष्टाचाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी लढणार'

तुम्ही मूठभर वाळूसाठी तळमळत आहात आणि त्यांचे नेते वाळू तस्करी करून करोडोंची कमाई करत आहेत, असे पीएम मोदी म्हणाले. त्यातून नोटांचे डोंगर बाहेर पडत आहेत. आता तुम्ही भाजप-एनडीए सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मी तुम्हाला वचन देतो की सरकार स्थापन झाल्यावर या भ्रष्टाचाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही न्यायालयात संपूर्ण लढा लढू. तुमचा हक्काचा पैसा तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च केला जाईल.

'आमच्या सरकारने झारखंडमध्ये लाखो कोटी रुपये खर्च केले'

पीएम किसान सन्मान निधीचे पैसे थेट झारखंडमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवतो आणि त्यांना संपूर्ण रक्कम मिळते. त्याचप्रमाणे महामार्ग, रेल्वे, विमानतळ अशी अनेक कामे आहेत, ज्यावर केंद्र सरकार थेट खर्च करते, त्यामध्ये कपात करण्याची संधी कोणालाही मिळत नाही. झारखंडमध्येही आमच्या सरकारने लाखो कोटी रुपये खर्च केले आहेत.

Narendra Modi Jharkhand News
Prashant Kishor on Bihar By-Election: बिहार पोटनिवडणूक पुढे ढकलण्याची मागणी; प्रशांत किशोर पोहचले सर्वोच्च न्यायालयात!

'भाजप-एनडीए सरकार नवीन उद्योगांना चालना देत आहे'

पीएम मोदी म्हणाले की, भाजप-एनडीए सरकार नवीन उद्योगांना चालना देत आहे. झारखंडमधील जुने बंद कारखानेही आम्ही सुरू करत आहोत. सिंद्रीचा खत कारखानाही आधीच्या सरकारांच्या गलथान कारभारामुळे बंद पडला. आम्ही सिंद्री खत कारखाना सुरू केला. यामुळे झारखंडमधील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

'आपण एकत्र राहिलो तर सुरक्षित राहू'

ओबीसी समाजाला 1990 मध्ये आरक्षण मिळाले. विविध ओबीसी जातींचे संख्याबळ एकत्र आल्याने काँग्रेसला आजपर्यंत लोकसभेच्या 250 जागाही जिंकता आलेल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसला ओबीसींची ही सामूहिक ताकद मोडून काढायची आहे आणि ही ताकद तोडून ओबीसींना शेकडो विविध जातींमध्ये विभागायचे आहे. समाजाचे विघटन व्हावे, छोटय़ा-छोटय़ा तुकडय़ांमध्ये विभागले जावे, असे कोणालाही वाटत नाही. म्हणूनच आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे - जर आपण एकत्र राहिलो तर आपण सुरक्षित राहू.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com