Narendra Modi Speech : काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. अदानी प्रकरणी राहुल गांधी यांनी विचारले होते की, सरकार आणि अदानी यांचा संबंध काय? गौतम अदानी ६०९ व्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत कसे बनले, ही संपूर्ण जादू मोदी सरकार आल्यानंतर कशी काय घडून आली? यानंतर आत आज संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी विरोधकांवपर जोरदार हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विरोधकांच्या एकजुटीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, आज विरोधकांचे गीत मिले सूर मेरा तुम्हारा आहे. ईडीमुळे ही विरोधकांची एकजूट झाली आहे. ईडीच्या तपासाच्या भीतीने या लोकांना एका मंचावर आणले आहे. काही लोक हार्वर्ड विद्यापीठाबद्दल खूप बोलतात. हार्वर्ड विद्यापीठाने गेल्या काही दिवसात मोठा अभ्यास केला आहे. तो विषय भारतीय काँग्रेस पक्षाचा उदय आणि अधःपतन. मला खात्री आहे की आणखी मोठ्या विद्यापीठांमध्ये काँग्रेसचा विनाश यावर आणखी अभ्यास व्हायला हवा.
पीएम मोदी म्हणाले की, आम्ही नऊ वर्षांचा काळ पाहिला आहे. त्यांची दिवाळखोरी पाहिली आहे. रचनात्मक टीकेची जागा विरोधाच्या टीकेने घेतली आहे. त्यांच्या आवाजात अनेकांनी आपले स्वर मिसळले आहेत. मिले सूर तेरा मेरा. यामुळे ते एका व्यासपीठावर आले नाहीत, पण ईडीमुळे हे लोक एकत्र आले आहेत. या लोकांना, विरोधी पक्षांना एका मंचावर आणले. याबद्दल या लोकांनी ईडीचे आभार मानले पाहिजेत. देशातील मतदार जे करू शकले नाहीत, ते ईडी या संस्थेने केले.
"विरोधी पक्ष निराशेमधघ्ये बुडालेले आहेत. काही लोक या देशाची प्रगती स्वीकारण्यास सक्षम नाहीत. यांना भारतातील लोकांचे कर्तृत्व दिसत नाही. गेल्या 9 वर्षात देशात 90 हजार स्टार्टअप्स सुरू झाले आहेत. इतक्या कमी वेळात आणि कोरोनाच्या गंभीर काळात 108 युनिकॉर्न बनवले गेले आहेत. युनिकॉर्न म्हणजे 6 ते 7 हजार कोटींची किंमत.
आज भारत मोबाईल निर्मितीच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या बाबतीत आपण तिसऱ्या क्रमांकावर आलो आहोत. अक्षय ऊर्जेच्या बाबतीत आपण जगात चौथ्या क्रमांकावर आहोत. भारतीय खेळाडू क्रीडा क्षेत्रात आपली क्षमता दाखवत आहेत. प्रथमच उच्च शिक्षणातील प्रवेशाचा आकडा 4 कोटींच्या पुढे गेला आहे," असे मोदी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.