Narendra Modi On Congress : मोदींची भविष्यवाणी, काँग्रेसचा अविश्वासाचा ठराव अन् 'तो' व्हिडिओ व्हायरल...

NDA Vs INDIA : अविश्वासाच्या ठरावामुळे मोदी सरकारवर पुन्हा एकदा बहुमत सिद्ध करण्याची वेळ
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : मणिपूर हिंसाचारावरून लोकसभेत विरोधक पंतप्रधान मोदी सरकारची कोंडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. मणिपूरमधील महिलांवर झालेल्या अत्याचाराबाबत मोदी लोकसभेत बोलत नाहीत पण बाहेर बोलतात. या प्रकरणी त्यांनी सभागृहात येऊन निवेदन करावे, अशी विनंती करूनही मोदी दाद देत नाहीत. हे पाहून आक्रमक विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास ठारावाचे शस्त्र उगारले आहे. या ठरावास मंजुरी मिळाली असल्याने मोदी सरकारला आता आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. (Latest Political News)

Narendra Modi
Uddhav Thackeray On Prakash Ambedkar: शरद पवार, ठाकरे अन् प्रकाश आंबेडकरांची ऐकी होणार का ? मुलाखतीत सांगितले कारण..

यापूर्वी विरोधकांनी २०१८ मध्येही मोदी सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव मांडला होता, मात्र तो १९९ मतांनी पराभूत झाला. यानंतर २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधक पुन्हा एकदा २०२३ मध्येही माझ्याविरोधात अविश्वास ठराव आणतील, अशी भविष्यवाणी केली होती. दरम्यान, २६ जुलै २०२३ रोजी विरोधकांनी मोदींविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याने मोदींचा २०१९ मधील तो व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे.

मोदींनी ७ फेब्रुवारी २०१९ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या भाषणावरील चर्चेदरम्यान विरोधकांना टोला लगावताना भाकित केले होते. मोदी म्हणाले होते, की विरोधकांनी २०२३ मध्ये आणखी एका अविश्वास प्रस्ताव दाखल करता येईल एवढे खासदार ठेवण्याची तयारी करावी. २०१८ मध्ये मला एकट्याला घेरण्यासाठी संपूर्ण विरोधकांची फौज एकवटली होती. मात्र पळता भूई थोडी पडेल असा त्यांचा पराभव झाला, असाही उल्लेख या 'व्हिडीओ'मध्ये मोदी करताना दिसत आहेत.

Narendra Modi
Uddhav Thackeray News : "उद्धव ठाकरे आमदाराकीचा राजीनामा देणार होते, त्याचे काय झाले ?" भाजप नेत्याचे ठाकरेंच्या वर्मावर बोट

पंतप्रधान मोदी लोकसभेत म्हणाले होते, "विरोधकांना मला माझ्या शुभेच्छा द्यायच्या आहेत... की आता एवढी तयारी करा की तुम्हाला २०२३ मध्ये पुन्हा अविश्वास आणण्याची संधी मिळेल." पुढे 'व्हिडिओ'मध्ये मोदी म्हणतात, "आमच्या खासादारांची संख्या दोनवरून २०० प्लस गेली आहे. हे लोकांच्या सेवेतून घडले. तुम्ही मात्र ४०० वरून ४० वर आला असून हा तुमच्या अहंकाराचा परिणाम आहे. आज तुम्ही कुठे आहात ते पहा", असा टोलाही मोदींनी काँग्रेसचे नाव न घेता लगावला होता.

मणिपूर हिंसाचारावर संसदेत बुधवारी गोंधळ सुरू असताना, काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला असून तो लोकसभेतही मंजूर झाला. विरोधक नियम २६७ अन्वये मणिवर हिंसाचाराच्या मुद्द्यावर चर्चा करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. राज्यसभेच्या अध्यक्षांनी विरोधकांच्या सर्व सूचना फेटाळताना बुधवारी सांगितले, "विरोधकांनी दाखल केलेला अविश्वासाचा प्रस्ताव नियम १७६ अन्वये आधीच स्वीकारला आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com