BJP rally : हिशेब होणार? बालेकिल्ल्यात दुसऱ्याच उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडताना भाजप नेत्याला रडू कोसळलं! काँग्रेस फायद्यात?

Narottam Mishra news, Datia Assembly by-election, Ashutosh Tiwari : नरोत्तम मिश्रा यांची नाराजी सर्वांसमोर पहिल्यांदाच उघडपणे समोर आली आहे. त्याचा चुकीचा संदेश त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जावू शकतो. ही मते काँग्रेसकडेही झुकू शकतात.
Datia Assembly by-election
Datia Assembly by-electionSarkarnama
Published on
Updated on

Datia bypoll update : मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघाचे माजी आमदार आणि राज्याचे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचे तिकीट कापत भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कनेक्शन असलेल्या आशुतोष तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर झालेल्या पहिल्या प्रचार सभेत मिश्रा यांना रडू कोसळलं.

भाजपने तिवारी यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर दतिया भाजपमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले होते. मिश्रा यांच्या कार्यकर्त्यांनी प्रमुख रस्त्यांवर आंदोलन करत उमेदवारीला तीव्र विरोध केला होता. मात्र, दिल्लीतून बोलावणे आल्यानंतर मिश्रा यांच्यासह कार्यकर्त्यांचा रोषही थंडावला.

अखेर सोमवारी तिवारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खुद्द मिश्रा उपस्थित होते. मिश्रा हे आता तिवारी यांचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत. अर्ज दाखल करताना झालेल्या सभेत बोलताना मिश्रा यांना रडू कोसळले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री मोहन यादव हेही उपस्थित होते. यादव यांनीच मिश्रा यांचे तिकीट कापल्याचा आरोप मिश्रा यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

Datia Assembly by-election
Manmohan Singh news : मी आत्महत्या करेन! माजी PM मनमोहन सिंग यांच्याबाबत तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्तांकडून मोठा खुलासा

मिश्रा यांचे काही मिनिटे अश्रू थांबत नव्हते. त्यांच्याशेजारी बसलेल्या मुख्यमंत्र्‍यांकडून त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला जात होता. ही सगळी दृश्य उपस्थित पाहत होते. त्यामुळे आता मिश्रा यांच्या अश्रूच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब होईल, अशी चर्चा दतिया मतदारसंघात सुरू झाली आहे. मिश्रा यांचे हेच अश्रू भाजपचा खेळ बिघडवू का, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

नरोत्तम मिश्रा यांची नाराजी सर्वांसमोर पहिल्यांदाच उघडपणे समोर आली आहे. त्याचा चुकीचा संदेश त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जावू शकतो. ही मते काँग्रेसकडेही झुकू शकतात. मिश्रा यांच्यासारख्या बाहुबली नेत्याला मंचावर रडावे लागत असेल तर कार्यकर्त्यांमध्येही तीव्र रोष निर्माण होण्याची भिती भाजपसमोर असेल.

Datia Assembly by-election
Recruitment News : राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनीच केला भरतीत घोळ, दोन लेकींना लावली सरकारी नोकरी; राज्यपालांकडून तडकाफडकी निलंबन

मागील निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराने मिश्रा यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. मिश्रा यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. खरे तर त्यांच्याकडे मुख्यमंत्रि‍पदाचा प्रबळ दावेदार म्हणूनही पाहिले जात होते. आता पोटनिवडणुकीत त्यांचेच तिकीट कापण्यात आल्याने त्यांची नाराजी समोर आली आहे. भाजपच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com