Raj Thackeray News: आता जे झालं ते गोड माना..; राज ठाकरेंनी अजित पवारांचं तीन मिनिटातच...

National Cartoonist Day 2023: अजितदादांभोवती संशयाचं वलय निर्माण झालेलं असतानाच
National Cartoonist Day 2023 Raj Thackeray
National Cartoonist Day 2023 Raj Thackeray Sarkarnama

National Cartoonist Day 2023: आपल्या भाषणांमुळे, रोखठोक स्वभावामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे देशभरात चर्चेत असतात, पण राजकारणाशिवाय ते उत्तम व्यंगचित्रकारही आहेत.

नरेंद्र मोदी, राहुल गांधी, लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे, बाळासाहेब ठाकरे, एसटीचा संप असो वा शेतकऱ्यांची व्यथा, राज ठाकरे आपल्या कार्टून्समधून सतत व्यक्त होत असतात. त्यांचा प्रत्यय आज पुण्यात आला. महाराष्ट्रातही अनेक व्यंगचित्रकार आहेत. त्यापैकी एक राज ठाकरे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन चर्चा होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शुक्रवारी) राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांचे व्यंगचित्र काढलं.

अजित पवारांचे चित्र काढल्यानंतर त्यांनी त्यावर प्रतिक्रियाही दिली. आपल्या कुंचल्यातून राज ठाकरे यांना नेमकं काय सांगायचं आहे? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.

राज ठाकरे यांना आयोजकांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर व्यंगचित्र काढायला सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी हे व्यंगचित्र काढलं. कोऱ्या कॅनव्हासवर रेषांच्या फटकाऱ्यांने अवध्या तीन मिनिटांमध्ये त्यांनी अजितदादांचं व्यंगचित्र काढलं. अजितदादांभोवती संशयाचं वलय निर्माण झालेलं असतानाच राज ठाकरे यांनी त्यांचं व्यंगचित्र काढल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

National Cartoonist Day 2023 Raj Thackeray
NCP New Chief : मोठी बातमी : शरद पवारांचा राजीनामा समितीने फेटाळला ; कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न ; अध्यक्षपदी..

5 मे म्हणजे जागितक व्यंगचित्रकार दिन. त्यानिमित्ताने युवा संवाद सामाजिक संस्था आणि कार्टुनिस्ट कम्बाईन यांच्या वतीने आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुहास पंडित, युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनंजय गरड, कार्टुनिस्ट कम्बाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री आणि सचिव योगेंद्र भगत उपस्थित होते. बालगंधर्वमध्ये आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

National Cartoonist Day 2023 Raj Thackeray
Sanjay Raut News : राजकारणात अपघाताने काहीही घडत नाही ; राऊताचं सूचक Tweet ; 'हे पैज लावून..'

मला असं व्यंगचित्र काढायची सवय नाही..

महोत्सवाचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राज ठाकरे यांना एक व्यंगचित्र काढण्याची विनंती केली, त्यावेळी त्यांनी अजित पवार यांचे व्यंगचित्र काढणे पसंत केले. यावेळी राज ठाकरे म्हणाले, "असं राजकीय व्यंगचित्र काढण्यासाठी पुरेसा वेळ लागतो. खूप दिवसांनी कुंचला हाती धरला आहे. बाळासाहेबांप्रमाणे बैठक मारून चित्र काढण्याची सवय आहे. आता जे झालं ते गोड माना. मला असं व्यंगचित्र काढायची सवय नाही,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com