सिध्दू लागले कामाला; थेट सोनियांना पत्र लिहित करून दिली आश्वासनांची आठवण

पंजाब काँग्रेससमोरील अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत.
Navjot Singh Sidhu
Navjot Singh Sidhu
Published on
Updated on

चंदीगड : पंजाब काँग्रेससमोरील (Punjab Congress) अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत. अचानक राजीनामा देत सर्वांनाच धक्का देणारे प्रदेशाध्यक्ष नवज्योतिसिंग सिध्दू (Navjot Singh Sidhu) यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या (Congress Leader Rahul Gandhi) भेटीनंतर माघार घेतली. या राजीनामा नाट्यानंतर सिध्दू लगेच कामाला लागले आहेत. पण यावेळीही त्यांनी पक्षाला 2017 च्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे. त्यासाठी त्यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहीत राज्य सरकारला सुचित करण्याची मागणी केली आहे.

मागील काही दिवसांपासून पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद सतत चव्हाट्यावर येत आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकण्यात आली. त्यानंतर सिध्दू नाराज झाल्याचे समोर आले. आपल्या गोटातील नेत्यांना मंत्रिपद न मिळाल्यानेही त्यांची नाराजी होती. अमरिंदर सिंग यांनीही उघडपणे सिध्दूंविरोधात आघाडी उघडली.

Navjot Singh Sidhu
त्या एवढ्या मोठ्या नाही, या पवारांच्या वक्तव्यावर पंकजांचा पलटवार

यानंतर सिध्दूंनी तडकाफडकी राजीनामा दिला. पण पक्षाकडून हा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. अखेर दोन दिवसांपूर्वी त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेत राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले. आता त्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहीत राज्याशी संबंधित तेरा मुद्दे उपस्थित केले आहेत.

काँग्रेस पक्षाने 2017 च्या निवडणूक दोन तृतियांश बहुमत मिळवलं होतं. यावेळी जनतेला आर्थिक आणि लोकशाही अधिकारांना मजबूत करण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. मी स्वत: 55 मतदारसंघात प्रचार केला होता. त्यापैकी 53 मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळाला आहे. आमदार, मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्ष असताना मी पंजाबच्या विकासाच्या मॉडेलला प्राधान्य दिले आहे, असं सिध्दू यांनी पत्रात म्हटले आहे.

पंजापमधील शेती, ड्रग्ज, वीज, रोजगार, अनुसूचित जाती आणि मागासवर्गाचे कल्याण, महिला व युवक कल्याण, वाहतूक, केबल माफिया आदी तेरा मुद्दे सिध्दू यांनी पत्रात मांडले आहेत. या मुद्यांवर योग्य कार्यवाही करण्याबाबत राज्य सरकारला सुचित करावे, अशी मागणी सिध्दू यांनी केली आहे. पक्षाची झालेली हानी भरून काढण्यासाठी कचाचित ही शेवटची संधी आहे. या मुद्यांना 2022 च्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही स्थान मिळावे, असेही त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com