BJP मित्रपक्षांना संपवतो... नितीशकुमारांचे पाऊल योग्यच : शरद पवार

BJP | Sharad Pawar | राज्यातही शिवसेना-भाजप अनेक वर्ष सोबत होते
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

बारामती : बिहार नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी भाजपसोबत काडीमोड घेतला असून ते आज राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन करणार आहेत. दरम्यान त्यांनी यांनी उचलेले हे पाऊल शहाणपणाचे आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नितीशकुमार यांच्या कृतीचे समर्थन केले आहे. बारामतीत आज माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी बिहारच्या घटनाक्रमावर प्रतिक्रिया दिली. (Sharad Pawar Latest News)

शरद पवार म्हणाले, भाजप मित्रपक्षांना निवडणुकीवेळेस सोबत घेऊन निवडणूक लढतो, पण त्या निवडणुकीत मित्रपक्षांचे उमेदवार कमी कसे निवडून येतील हे ते पाहतात, एक प्रकारे प्रादेशिक पक्षांना संपविण्याचेच काम भाजपकडून सुरु आहे.

बिहारमध्ये नितिशकुमार यांनी टाकलेले पाऊल योग्यच होते. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काही दिवसांपूर्वीच फक्त भाजपच पक्ष देशात राहिल, प्रादेशिक पक्षांना भविष्यात अस्तित्व नसेल असे वक्तव्य केले होते, नितीशकुमार यांचीही हीच भावना आहे, भाजप त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांना हळुहळू संपवतो, प्रकाशसिंग बादलांसारखे ज्येष्ठ नेते भाजपसोबत गेले आणि अकाली दल संपुष्टात आल्यात जमा आहे, अशी खंत व्यक्त केली. (Sharad Pawar reaction on Nitish kumar)

राज्यातही शिवसेना भाजप अनेक वर्ष सोबत होते, आता भाजपने एकनाथ शिंदे यांना हाताशी धरुन सेनेत फूट पाडली. हेच चित्र बिहार आणि पश्चिम बंगालमध्येही दिसत होते. नितीशकुमारांना बिहारमध्ये लोकमान्यता आहे, महाराष्ट्रातील चित्र बिहारमध्ये दिसेल असे वाटल्याने नितीशकुमार सावध झाले आणि ते भाजपपासून वेगळे झाले. भाजपने त्यांच्या या कृतीबद्दल कितीही टीकाटीपण्णी केली तरी त्यांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचेच होते व त्यांचा निर्णय योग्यच होता असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com