Sule Vs Tatkare : ''स्वत:चं अपयश झाकण्यासाठी....'' ; सुनील तटकरेंचं सुप्रिया सुळेंच्या आरोपांना प्रत्युत्तर!

NCP Hearing : ''...यामुळे केवळ टीका करण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक बोलल्या जातात,'' असंही तटकरे म्हणाले आहेत.
Sule Vs Tatkare
Sule Vs TatkareSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, सुप्रिया सुळेंनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

सुनील तटकरे, ''सुप्रिया सुळेंचं कालचं विधान मी ऐकलं. नरेंद्र मोदींच्या सरकारवर जो अविश्वासाचा ठराव आला, तो लोकसभेत त्या दिवशी चर्चेला होता. खरंतर मी आज सगळ्याच गोष्टी उघड करणार नाही. परंतु व्हीप बजावण्याअगोदर पडद्याआड बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या, मलाही त्याच आहेत. कदाचित जयंत पाटील यांना कोणी संपर्क केला आणि त्यांनी जर याबाबत विश्लेषण केलं, तर ठीक राहील. नाहीतर काळाच्या ओघात मीसुद्धा त्या ठिकाणी बोलेल.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच ''दुसऱ्या दिवशी ज्यावेळी चर्चा सुरू झाली ती अविश्वास प्रस्तावावरील होती. ज्यावेळी अविश्वासाच्या ठरावावर मतदानाची वेळ आली, त्यावेळी काँग्रेसच्या नादाने त्यांनी त्यावेळी बाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे प्रत्यक्षात मतदानाची वेळ त्यावेळी आली नाही,'' असं तटकरे म्हणाले.

याशिवाय, ''एक स्वच्छ आहे, एनडीएमध्ये आम्ही सहभागी झालो असल्याने. सरकारच्या विरोधात ज्यावेळी अविश्वासाचा प्रस्ताव येतो. त्यावेळी सरकारच्या बाजूने आम्ही असल्याने सरकारच्या बाजूनेच आम्ही मतदान केलं, यात दुमत नाही. निर्भया प्रकरणानंतर जेव्हा मनमोहनसिंग यांच्या सरकारविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आला होता. त्यावेळी सरकार पक्षात असताना खासदारांनी कोणाच्या बाजूने मतदान केलं असतं? यामुळे केवळ टीका करण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक बोलल्या जातात,'' असं तटकरेंनी सांगितलं.

Sule Vs Tatkare
Ajit Pawar Group News : सुनावणी सुरू असतानाच अजित पवार गटाचे महत्त्वपूर्ण पाऊल...कर्जतमध्ये ठरणार राजकीय रणनीती

याचबरोबर ''काल सुप्रिया सुळे प्रामुख्याने असंही म्हणाल्या, की महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या वेळी मी उपस्थित नव्हतो मतदान केलं नाही. खरंय, पंतप्रधान मोदींचं भाषण मी पूर्णपणे ऐकलं आणि मी वारंवार पत्रकार परिषदेत सांगितलं आहे की, गणपतीचा तो पहिला दिवस होता म्हणून मला जाणं आवश्यक होतं. लोकसभेचे ५४२ सदस्य आहेत, मतदानात सहभागी झालेल्या मतदारांची संख्या ४८० होती, त्यामुळे उरलेले सगळे हे महिलाविरोधी आहे. असं सातत्याने म्हणणं हे चूक आहे.

Sule Vs Tatkare
Sunil Kedar News : माजी मंत्री सुनील केदारांचं टेन्शन वाढलं ; 'या' खटल्याचा 28 नोव्हेंबरला निकाल

स्वत:चं अपयश झाकण्यासाठी नैराश्यापोटी ज्यावेळी दुसऱ्यांवर आरोप केले जातात, त्यावेळी ही अशी स्थिती निर्माण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळू शकते,'' अशा शब्दांमध्ये तटकरे यांनी सुप्रिया सुळेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com