Sharad Pawar News: शरद पवार सोमवारपासून संसदेत; विरोधकांच्या रणनीतीला बळ मिळणार

NCP News: शरद पवार संसदेत महाराष्ट्रातील प्रश्न मांडणार
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: संसदेचे अधिवेशन भरून चार दिवस झाले, तरी अधिवेशनात न दिसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारपासून मात्र, अधिवेशनाला हजर राहणार आहेत. स्व:पक्षातील बंड, नवे सरकार, पक्षातील चढाओढीच्या राजकारणामुळे पवार हे बैठका, गाठीभेटीत असल्याने ते अधिवेशनाला जाऊ शकले नसल्याची माहिती आहे.

संसदेचे अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होऊन चार दिवस झाले आहेत. आता सोमवारी पवार अधिवेशनाला हजेरी लावणार असून मणिपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटना, महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडीचे राजकारण, शेतकऱ्यांचे प्रश्न, अशा प्रश्नाबद्दल मोदी सरकारचे ते लक्ष वेधण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar
Devendra Fadnavis News : निधीवाटपात देवेंद्र फडणवीसांचा अजितदादांवर 'भरवसा'

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड करत पक्षावर सांगितलेल्या दाव्यामुळे शरद पवार चांगलेच पेचात सापडले. मात्र, त्यानंतर लगेचच पवारांनी थेट मैदानात उतरत स्व:पक्षातीलच पण बंड केलेल्या नेत्यांना थेट आव्हान दिले. यानंतर पवारांनी बैठकांचा धडाका लावत सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या. आता ते अधिवेशनातही हजेरी लावणार असल्याने त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar
Anna Hazare On Manipur: काय होणार या देशाचे? अण्णा हजारे मोदींवर भडकले

मणिपूरात घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटत आहेत. महिलांवरील झालेल्या अत्याचाराने संपूर्ण देश हादरला. तर महाराष्ट्रातील इर्शाळवाडीच्या दुर्घटनेत तब्बल 25 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. या प्रश्नांवर पवार सरकारचे लक्ष केंद्रीत करणार असल्याचं बोललं जात आहे. गेल्या चार दिवसांपासून अधिवेशनाला उपस्थित नसलेले पवार आता सोमवारी हजेरी लावणार असल्याने सरकारला प्रश्न विचारायला विरोधकांनाही आणखी बळ येईल.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com