UPAच्या अध्यक्षपदाबाबत शरद पवाराचं मोठं विधान, म्हणाले, 'नेतृत्व करण्याची जबाबदारी..'

मी काही जबाबदारी घेणार नाही. पण एकत्र येऊन काही पर्याय देता येत असेल तर त्यांना सहकार्य देण्यासाठी माझी तयारी आहे.
sharad pawar
sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)हे देखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. तेव्हापासून शरद पवार संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA)अध्यक्ष होण्यासंबंधीच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांना आज शरद पवारांनी आज पूर्णविराम दिला. पवार कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलते होते.

शरद पवार म्हणाले, ''युपीएच्या अध्यक्षपदासाठी मला रस नाही, जनाधार असलेल्या पक्षांना एकत्र घेऊन पर्याय द्यावा, विरोधकांनी एकत्र यावे, यासाठी मी पाठिंबा आणि जी मदत हवी असेल ती देणार आहे. मी काही नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणार नाही. मध्यंतरी आमच्या एका तरुणाने युपीएचा अध्यक्ष व्हावा यासाठी ठराव केला. मला त्यात अजिबात रस नाही, मी त्याच्याच पडणार नाही. मी काही जबाबदारी घेणार नाही. पण एकत्र येऊन काही पर्याय देता येत असेल तर त्यांना सहकार्य देण्यासाठी माझी तयारी आहे,''

sharad pawar
शरद पवारांनी दिलं राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर, म्हणाले…

''इतर सर्व पक्षांचीही राज्या राज्यांमध्ये शक्तीकेंद्र आहेत. पण काँग्रेस एक असा पक्ष आहे जो देशाच्या प्रत्येक राज्यात कमी जास्त प्रमाणात आहे. आज त्यांची सत्ता नसेल पण काँग्रेस कार्यकर्ता देशाच्या प्रत्येक राज्यातील जिल्ह्यात, गावात पहायला मिळतो. त्यामुळे पर्यायी काही करायचं असेल तर ज्या पक्षाचा वेस व्यापक आहे त्याला घेऊन करणं वास्तव्याला धरुन होईल. तसा विचार वेगवेगळ्या पक्षातील लोक करत असतील तर त्याच्यातून काही निर्णय येण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाने एकत्र यावं असं म्हणतात त्यावेळी काही वास्तव गोष्टी दुलर्क्ष करुन चालणार नाहीत.ममता बॅनर्जींचा अत्यंत शक्तिशाली पक्ष आहे, सत्ता असून लोकांचा पाठिंबा आहे,'' असे पवार म्हणाले.

sharad pawar
पवारांचे नाव घेतले की चर्चा होतेच..हे डोक्यात ठेवूनच काही जण भाषण करतात, राज यांना टोला

संजय राऊतांनी युपीएचा सातबारा काँग्रेस आणि गांधी घराण्याकडे असून तो बदलण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे, याबाबत पवारांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, '' ते संजय राऊत यांचे मत आहे माझं मत नाही,''

दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. काँग्रेस नेतृत्व करु शकत नाही असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं म्हणणं आहे. शरद पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाला रोखलं जाऊ शकतं असं या ठरावात म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com