राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यांत निवडणूक लढवणार : शरद पवारांची घोषणा

मी लवकरच उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर जाणार आहे.
sharad pawar
sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : पाच राज्याच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. त्यातील तीन राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. (NCP to contest elections in three states: Sharad Pawar's announcement)

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या निवडणूक रणनीतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार आहे. त्यात मणिपूरमध्ये आम्ही पाच जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही समाजवादी पक्षाबरोबर जाणार आहेत. त्या ठिकाणी इतर छोट्या पक्षांनाही सोबत घेतले जाणार आहे. लखनौमध्ये उद्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत आघाडीबाबत चर्चा होणार आहे. त्यात कोणाला कोणत्या आणि किती जागा सोडायच्या हे ठरले जाणार आहेत. त्या बैठकीला उत्तर प्रदेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पी. के. शर्मा हे जाणार आहे.

sharad pawar
भाजप अडचणीत : मुख्यमंत्री योगींचे दिल्लीत पाऊल अन् मंत्र्यानं दिला झटका

दरम्यान, गोव्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आमची निवडणूकपूर्व युतीची चर्चा सुरू आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून खासदार प्रफुल्ल पटेल, शिवसेनेकडून संजय राऊत आणि काँग्रेसकडून स्थानिक नेते एकमेकांशी संवाद साधत आहेत. त्यातून नक्की मार्ग निघेल आणि आम्ही सर्वजण एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जावू. गोव्यात भाजपचे सरकार हटविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्नाची गरज आहे.

आमच्या यूपीतील काही सहकाऱ्यांनी प्रचारासाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. माझ्यासह राष्ट्रवादीचे सर्व नेते प्रचारात सामील होणार आहोत. त्यामुळे मी लवकरच उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

sharad pawar
गिरीश महाजनांच्या विरोधात फास आवळला : टेंपोभर कागदपत्रे ताब्यात!

उत्तर प्रदेशात या निवडणुकीतून परिर्वतन होणार आहे. तेथील लोकांना यंदा बदल हवा आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ८० टक्के लोक आमच्याबरोबर आहे, २० टक्के लोक आमच्यासेाबत नाहीत, असे विधान केले हेाते. हे वीस टक्के कोण, हे एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभा देणारे नाहीत. मात्र त्यांची विचारधारा त्याच पद्धतीची आहे. त्यांच्या मनात जे आहेत, ते त्यांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षा विचार मजबूत करण्याची गरज आहे. योगी आदित्यनाथ यांच्या त्या विधानाला उत्तर प्रदेशची जनता या निवडणुकीतून उत्तर देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com