Sharad Pawar Announcement : राष्ट्रवादी कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढवणार; पण मोजक्या जागांवर : शरद पवारांची घोषणा

कर्नाटकात आमचं ध्येय महाराष्ट्र एकीकरण समिती आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना मदत कशी होईल, अशी आमची भूमिका राहणार आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कर्नाटक (Karnataka) विधानसभेची निवडणूक (Assembly election) लढवणार आहे. काही मोजक्या जागांवर आम्ही आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक उभे करणार आहोत. जास्त जागांवर आम्ही निवडणूक लढवणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. (NCP to contest Karnataka assembly elections; But in few seats : Sharad Pawar)

नाशिकमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले. यावेळी पवार यांच्यासोबत माजी मंत्री छगन भुजबळही उपस्थित होते.

Sharad Pawar
Baramati Lok Sabha : बारामतीत शंभर टक्के कमळ फुलणार : केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचा भोरमध्ये दावा

राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले, तर त्याचा फायदा भाजपला होणार नाही का, या प्रश्नावर पवार म्हणाले की, कर्नाटकात विधानसभेच्या जागा अंदाजे २५० च्या आसपास आहेत. त्यातील पाच जागांवर आम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केले, तर भाजपला फायदा होईल, असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. कर्नाटकात आमचं ध्येय महाराष्ट्र एकीकरण समिती आहे. मराठी भाषिक आहेत, त्या मराठी भाषिकांमध्ये मतभेद नकोत, एकवाक्यता कशी करता येईल. तसेच, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना मदत कशी होईल, अशी आमची भूमिका राहणार आहे.

Sharad Pawar
Shivijaro Adhalrao Patil News : चंद्रकांतदादांनी कोल्हेंबाबत संकेत देताच आढळरावांकडून ‘फिल्डिंग’ लावायला सुरुवात!

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आमची भूमिका कायम राहिलेली आहे. या प्रश्नावर स्वतः छगन भुजबळ आणि आमचे अनेक सहकारी कारागृहामध्ये जाऊन आलेले आहेत. असं असताना शक्यतो मराठी भषिकांमध्ये एकवाक्यता कशी राहील, याची काळजी आम्ही घेतो, तेही सहा-सात मतदारसंघापेक्षात. त्यापेक्षा अधिक नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar
Pune Politics : एकमेकांवर तोंडसुख घेणारे दिलीप मोहिते-आढळराव पाटील रंगले हास्यविनोदात!

कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर येणार : पवार

पवार म्हणाले की, मला कर्नाटकातील परिस्थिती माहिती आहे. मी आमच्या अनेक सहकाऱ्यांशी विचारविनिमय केला आहे, त्यानुसार कर्नाटकातील निवडणुकीत भाजपचा पराभव होईल. त्या राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल, असे तेथील चित्र आहे. कर्नाटकातील लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल लोकांना भाजपचे उमेदवार घरी बसवून हवा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com