Nepal Plane Crash : नेपाळमधील विमान अपघातात ४५ जणांचा मृत्यू ; ५ भारतीयांचा समावेश

Nepal Plane Crash News : , लँडिंगपूर्वी 10 सेकंद अगोदर या विमानात आगीचे लोट दिसून आले. त्यामुळे हा अपघात खराब हवामानामुळे घडल्याचे म्हणता येत नाही.
Nepal Plane Crash news
Nepal Plane Crash newssarkarnama
Published on
Updated on

Nepal Plane Crash : नेपाळमध्ये विमान अपघात झाला आहे. आतापर्यंत विमानातून ४५ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यात पाच भारतीयांचा समावेश आहे, नेपाळमधील (Nepal) पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pokhara International Airport in Nepal) हा अपघात झाला.

आज (रविवारी) सकाळी 8 च्या सुमारास हा अपघात झाला. बचाव पथकाने स्थानिकांच्या मदतीने बचाव व मदत कार्य सुरू केले आहे. ATR-72 प्रकारचे हे विमान आहे. या अपघातात नेमक्या किती जणांचा मृत्यू झाला हे अजून स्पष्ट झाले नाही.

अपघाताच्या घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य सुरु झाले आहे. अपघातानंतर विमानतळ सर्व प्रकारच्या विमानोड्डाण आणि लँडींगसाठी बंद ठेवण्यात आले आहे. कमल के सी हे या विमानाचे कॅप्टन होते.

सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीच्या मते, लँडिंगपूर्वी 10 सेकंद अगोदर या विमानात आगीचे लोट दिसून आले. त्यामुळे हा अपघात खराब हवामानामुळे घडल्याचे म्हणता येत नाही.

कमल के सी हे या विमानाचे कॅप्टन होते. विमानातील 68 प्रवाशांत 53 नेपाळी, 5 भारतीय, 4 रशियन, 1 आयरीश, 2 कोरियन, 1 अफगाणी व एका फ्रेन्च व्यक्तीचा समावेश होता. यात 3 नवजात बाळांसह व 3 मुलांचाही समावेश होता.

भारताचे नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी नेपाळच्या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी हा दुर्दैवी अपघात असल्याचे म्हटले आहे.नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली असून घटनास्थळी लष्कर तैनात करण्यात आले. आता लष्कर स्वतः अपघातस्थळी बचाव मोहीम राबवत आहे.

5 भारतीयांसह 9 परदेशी नागरीक

विमानातील 68 प्रवाशांत 53 नेपाळी, 5 भारतीय, 4 रशियन, 1 आयरीश, 2 कोरियन, 1 अफगाणी व एका फ्रेन्च व्यक्तीचा समावेश होता. यात 3 नवजात बाळांसह व 3 मुलांचाही समावेश होता. एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बरतौला यांनी सांगितले की, आतापर्यंत एकाही व्यक्तीला जिवंत बाहेर काढता आले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com