Medha Patkar: नर्मदा बचाव आंदोलनकर्त्या मेधा पाटकर यांना पाच महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Medha Patkar Sentenced To Five Months Imprisonment: 23 वर्षे जुन्या मानहानीच्या खटल्यात दिल्ली न्यायालयाने हा निकाल दिला. दिल्लीच्या एका न्यायालयाने पाटकर यांना ही शिक्षा सुनावली आहे.
Medha Patkar
Medha PatkarSarkarnama
Published on
Updated on

New Delhi: दिल्लीच्या एका न्यायालयाने नर्मदा बचाव आंदोलनकर्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना पाच महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 23 वर्षे जुन्या मानहानीच्या खटल्यात दिल्ली न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

दिल्लीच्या नायब राज्यपालांशी संबंधित खटल्यात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. महानगर दंडाधिकारी राघव शर्मा यांच्या न्यायालयानसमोर ही सुनावणी झाली. नायब राज्यपाल सक्सेना आणि नर्मदा बचाव आंदोलन विरुद्ध जाहिराती प्रकाशित केल्याबद्दल सक्सेना यांनी पाटकर यांच्यावर 2000 मध्ये मानहानीचा दावा दाखल केला होता.

"न्यायालयाच्या या आदेशाच्या विरोधात माझे वकील आवाहन देतील," असे शिक्षा सुनावल्यानंतर 70 वर्षीय मेधा पाटकर यांनी सांगितले. पाटकर यांना या प्रकरणी मे महिन्यात दोषी ठरवले होते. नायब राज्यपाल सक्सेना आणि नर्मदा बचाव आंदोलन विरुद्ध जाहिराती प्रकाशित केल्याबद्दल सक्सेना यांनी पाटकर यांच्यावर 2000 मध्ये मानहानीचा दावा दाखल केला होता.

Medha Patkar
Bachchu Kadu: प्रशासनातील अफजलखानाचा शोध घेऊन ठोकून काढणार; बच्चू कडू संतापले

एका टीव्ही चॅनलवर आपल्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी व बदनामीकारक विधान केल्याबद्दल सक्सेना यांनी पाटकर यांच्याविरुद्ध दोन खटले दाखल केले होते.

"कुणाला बदनाम करण्याची माझी इच्छा नाही. आमच्या लढा हा गरीब,आदिवासी आणि दलितासाठी आहे. विकासाच्या नावाखाली कुणाचे विनाश, आणि विस्थापन आम्हाला मान्य नाही, असे पाटकर म्हणाल्या. माझे वकील कायदेशीर बाबी तपासून या निकालाला आवाहन देतील, असे पाटकर म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com