NITI Aayog 2025 Meeting: मोदींच्या बैठकीला दोन मुख्यमंत्र्यांची पाठ; काय आहे कारण?

Why did Nitish Kumar and Mamata Banerjee skip the NITI Aayog meeting: विकसीत भारत हे 140 कोटी जनतेचं स्वप्न आहे. गाव, शहरांचा विकास झाल्याशिवाय हे स्वप्न पूर्ण होणार नाही, त्यासाठी गाव, शहराचा विकास करा होईल, या दिशेने काम करणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले.
 

NITI Aayog 2025 Meeting
NITI Aayog 2025 Meeting Sarkarnama
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीति आयोगाची बैठक शनिवारी झाली. 2047 मध्ये विकसित भारतासाठी विकसित राज्य हा विषय या बैठकीचा होता. या बैठकीकडे दोन मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

तमिळनाडुचे मुख्यमंत्री स्‍टालिन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह अनेक राज्याचे मुख्यमंत्री या बैठकीस उपस्थित होते. विकसीत भारत हे 140 कोटी जनतेचं स्वप्न आहे. गाव, शहरांचा विकास झाल्याशिवाय हे स्वप्न पूर्ण होणार नाही, त्यासाठी गाव, शहराचा विकास करा होईल, या दिशेने काम करणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले.

एनडीएच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी आपण आलो असलो आहे, असे नीतीश कुमार यांनी सांगितले. यावर राष्ट्रीय जनता दलाने टीका केली आहे. यापूर्वीही नीतीश कुमार हे नीती आयोगाच्या बैठकील उपस्थित नव्हते, या वेळी त्यांच्या गैरहजरीवर चर्चा होत आहे, कारण ते एनडीए सरकारमध्ये सामील आहे.

आगामी काळातही त्यांचे एनडीए सरकारसोबत त्यांचे नातं चागले असेल, असे राजदने म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आज मोदींची बैठक आहे. या बैठकीला ते उपस्थित राहतील, असे राजदचे राष्ट्रीय प्रवक्ता मृत्यूंजय तिवारी यांनी म्हटलं आहे.

 

NITI Aayog 2025 Meeting
BJP Vs Congress: काँग्रेसची परीक्षा; महापालिकेवर झेंडा कायम राखण्याचे भाजपसमोर आव्हान

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी या शनिवारी बैठकीस उपस्थित नव्हत्या. त्यांच्याऐवजी पश्चिम बंगालचे प्रतिनिधी म्हणून मुख्य सचिव मनोज पंत हे आजच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

उज्ज्वला योजना, पीएम आवास योजना, जल जीवन मिशन, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया आदी योजनांचा आढावा आजच्या बैठकीत घेतला जाणार आहे. एनडीए शासित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची आज दिल्लीत मोदी यांच्या उपस्थित बैठक होत आहे. ऑपरेशन सिंदूर बाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com