India Alliance : 'इंडिया' आघाडीत वितुष्ट? नितीश कुमार नाराज...

Nitish Kumar : पंतप्रधानपदासाठी खर्गेंच्या नावाचा प्रस्ताव पण...
Nitish Kumar
Nitish Kumar sarkarnama
Published on
Updated on

New Delhi : 'इंडिया' आघाडीची बैठक दिल्लीमध्ये काल (19 डिसेंबर) झाली. आघाडीच्या 28 पक्षांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत भाग घेतला. नरेंद्र मोदींच्या विरोधात एकीच्या गोष्टी करणाऱ्या आघाडीच्या बैठकीत मात्र नाराजी नाट्य रंगले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata banerjee) यांनी आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun kharge) यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. खर्गे यांनी उमेदवार होण्यास नकार दिला. मात्र, या सगळ्यात आघाडीचे समन्वयक म्हणून आपली निवड होईल म्हणून अपेक्षा असणारे नितीश कुमार (Nitish Kumar) नाराज झाल्याची चर्चा आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषदेला न थांबता लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार हे दोघेही आपल्या हाॅटेलमध्ये निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

Nitish Kumar
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा लोकसभेतील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल... मिमिक्री प्रकरण तापलं

'इंडिया' आघाडीच्या पहिल्या बैठकीपासूनच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आघाडीचे समन्वयक म्हणून निवड केली जावी,अशी मागणी जनता दल पक्षाकडून करण्यात येत होती. दिल्लीत झालेल्या बैठकीच्या दिवशी देखील नितीश कुमार यांचे समन्वयकपदी निवड करण्यासाठीचे पोस्टर दिल्लीत लागले होते. मात्र, बैठकीत समन्वयकपदाबाबत चर्चाच झाली नाही. त्यात थेट ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून सुचवले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खर्गे हे दलित आहेत. दलित चेहऱ्यावर निवडणूक लढवली तर त्याचा फायदा होईल, असा दावा आघाडीतील काही नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यातच ममता बॅनर्जी यांनी मांडलेल्या प्रस्तावाला 12 पक्षांनी समर्थन दिले. पण खर्गे यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यास नकार देत आधी खासदार निवडून आणू मग पंतप्रधानपदावर चर्चा करू, असे म्हटले.

राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधान म्हणून चर्चेत येऊ नये म्हणून ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्याकडून खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला, असा टोला भाजपकडून लगावण्यात आला. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाद करण्यासाठी ममता बॅनर्जी आणि केजरीवाल यांच्याकडून चक्रव्यूह रचण्यात आल्याचे भाजप नेते गिरीराज सिंह यांनी म्हटले.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com