Nitish Kumar Visit Mumbai: पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण ?; नितीश कुमार घेणार शरद पवार, ठाकरेंची भेट; मोदींना रोखण्यासाठी..

Nitish Kumar News: भेटीत नेमकं ते काय बोलणार?
CM Nitish Kumar
CM Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Nitish Kumar Will Meet to Uddhav Thackeray and Sharad Pawar: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या विरोधात विरोधकांनी मोट बांधण्यास सुरवात केली आहे.

विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. ते गुरुवारी (ता.११) मुंबई दौऱ्यावर आहेत.

नितीश कुमार हे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत. ठाकरेंच्या भेटीनंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

या भेटीमध्ये ते ठाकरे आणि पवार यांना देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी उभारण्यासाठीच्या विशेष बैठकीचे निमंत्रण देणार असल्याचे समजते. भाजपाविरोधात एक मजबूत आघाडी बनवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. या भेटीत नेमकं ते काय बोलणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

CM Nitish Kumar
Sharad Pawar News : शरद पवारांच्या खेळीने भाजपचा 'प्लॅन' कचऱ्याच्या टोपलीत ; पण, वारसदार नेमण्यात अपयशी...

नितीश कुमार यांनी यापूर्वी पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांची देखील भेट घेतली आहे. त्यानंतर ते मुंबई दौऱ्यावर येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

CM Nitish Kumar
Rajasthan Politics : भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी वाचवलं होते आमचं सरकार ; काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट, व्हिडिओ पाहा

मला पंतप्रधान व्हायचे नाही..

काही जण नितीश कुमार यांचे नाव पुढे करीत आहेत, पण मला पंतप्रधान व्हायचे नाही, असे नितीश कुमार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. मला विरोधकांची मजबूत मोट तयार करायची असल्याचं यापूर्वीच नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. सर्वांनी एकजूट राहून भाजपला सामोरं जावं, अशी भूमिका नितीश कुमार यांनी घेतली आहे.

नितीश कुमार यांचा हा महाराष्ट्र दौरा विरोधकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. गुरुवारी नितीश कुमार हे दुपारी एक वाजता मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ते सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com