मुंबई : हारुख खानचा (Shaharukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) क्रूझ ड्रग्ज पार्टी (Drugs Party) प्रकरणात सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे. या कारवाईची पडताळणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाची चौकशी अद्याप पूर्ण झाली नसली तरी या एसआयटीचे काही खुलासे माध्यमांसमोर आले आहेत. यात प्रथम दर्शनी आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज आढळलेच नव्हते, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आर्यन खानला केलेली अटक आणि एकूणच संपूर्ण कारवाई एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना भोवण्याची दाट शक्यता आहे. (Aryan Khan Drugs Case News Updates)
मात्र एनसीबीचे विभागीय संचालक संजय सिंग यांनी स्पष्टीकरण देत असे खुलाश्यामध्ये तथ्य नसल्याचे सांगितले आहे. संजय सिंग म्हणाले, माध्यमांमधील बातम्या या धक्कादायक आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. या अहवालाची एनसीबीने अद्याप पडताळणी केलेली नाही. तसेच तपास देखील पूर्ण झालेला नाही. आताच काहीही सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. संजय सिंग यांच्या स्पष्टीकरणानंतर आर्यन खानची चिंता अद्याप संपलेली नाही, असेच म्हणावे लागेल.
एसआयटीचे काय निष्कर्ष आहेत?
प्रथम दर्शनी आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज आढळलेच नव्हते. तसेच अंमली पदार्थांच्या कोणत्याही मोठ्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा तो भाग असल्याचा कोणताही पुरावा या तपास पथकाला आढळून आलेला नाही. त्यामुळे त्याचा फोन घेवून त्याचे चॅट्स तपासण्याची गरज नव्हती. याशिवाय चॅट्स तपासले असले तरी ते असे सुचवत नाहीत की आर्यन कोणत्याही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा भाग होता, असेही मत यात मांडण्यात आले आहे.
तसेच आर्यनने त्याचा मित्र अरबाज मर्चंट याला संबंधित क्रूझवर ड्रग्ज आणण्यास सांगितलं नव्हते, असाही निष्कर्ष एसआयटीच्या चौकशीतून मांडण्यात आला आहे. याचसोबत समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले आहे की, एनसीबीच्या मॅन्युअलमध्ये अनिवार्य असूनसुद्धा छाप्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला नव्हता. गुन्ह्यात अटक केलेल्या अनेक आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज हे सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले आहेत, असाही निष्कर्ष एनसीबीच्या एसआयटीने काढला आहे.
या विशेष तपास पथकाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसून एस. एन. प्रधान यांना अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालाधी लागणार आहे. सध्या या अहवालातील काही गोष्टींवर कायदेशीर तज्ञ्यांची मत जाणून घेतली जात आहेत. विशेषत: आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज आढळले नसतानाही केवळ ड्रग्ज सेवनासाठी त्याला शिक्षा होऊ शकते का, या मुद्द्यावर कायदेशीर मतं जाणून घेतली जात आहेत, अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.