कुतुबमिनारच्या आवारात खोदकाम करण्याची मागणी करणाऱ्या संघटना पडल्या तोंडघशी

दिल्लीतील कुतुबमिनारच्या परिसरात खोदकाम करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही इरादा नाही असे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी स्पष्ट केले
QutubMinar
QutubMinarsarkarnama

नवी दिल्ली : वाराणसीमध्ये ज्ञानवापी मशिदीच्या आतल्या भागाचे सर्वेक्षण व अन्य प्रक्रिया सुरू झाल्यावर, तेथे एक पुरातन कारंजे आढळल्याचे व तेच काशी विश्वनाथाचे शिवलिंग असल्याचे दावे प्रतिदावे सुरू आहेत. यानंतर मथुरा, ताजमहाल, कुतुबमिनार (Qutub Minar) व देशातील अनेक मशिदी व मुस्लिम शासनकाळातील ऐतिहासिक इमारतींबदद्लचा वाद उफाळला आहे. (Qutub Minar latest news)

'कुतुबमिनार परिसरात खोदकाम करण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाचे ४ अधिकारी, ३ इतिहासकार, संशओधक आदींचे पथक येथे खोदकाम करणार आहे, येथे सापडणाऱया मूर्तींची आयकोनॉगग्राफी करण्यात येईल,' अशा अफवा सोशल मिडियावर फिरू लागल्या आहेत. दिल्लीतील कुतुबमिनारच्या परिसरात खोदकाम करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही इरादा नाही असे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी स्पष्ट केले.

QutubMinar
अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश यांची अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल

काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी येथे पूर्वी मंदिर असल्याचा दावा करीत कुतुबमिनारच्या आवारात हनुमान चालीसा पठण केले होते. याबाबत सोशल मिडियावर अफवांचे पेव फुटले आहे. कुतुबमिनार परिसरात खोदकाम करण्यात येणार आहे.

भारतीय पुरातत्व विभागाचे ४ अधिकारी, ३ इतिहासकार, संशओधक आदींचे पथक येथे खोदकाम करणार आहे, येथे सापडणाऱया मूर्तींची आयकोनॉगग्राफी करण्यात येईल, अशा अनेक अफवा सोशल मिडीयावर फिरू लागल्या आहेत.

QutubMinar
काँग्रेसला 'एक व्यक्ती-एक पद' चा विसर ; संकल्पाला पक्षश्रेष्ठींनी दाखवली केराची टोपली !

कुतुबमिनारच्या आवारात खोदकाम करण्याबाबतचा कोणताही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही. दरम्यान सांस्कृतिक मंत्रालयाचा हवाला देऊन सोशल मिडीयावर याबाबतचा मजकूर फिरत आहे त्यावर केंद्र सरकार कोणती कायदेशीर कारवाई करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुतुबमिनार परिसरात यापूर्वी १९९१ मध्ये खोदकाम करण्यात आले होते. मात्र त्याची कारणे वेगळी होती असे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन यांनी एका टीमबरोबर अलीकडेच कुतुब मिनार परिसराची पाहणी केली असेही यात म्हटले आहे. मात्र सोशल मिडीयावरील कुतुबमिनारबाबतची सारी माहिती या निव्वळ अफवा आहेत असे रेड्डी यांनी स्पष्टपणे सांगितले. यामुळे कुतुबमिनारच्या आवारात खोदकाम करण्याची मागणी करणाऱया संघटना तोंडघशी पडल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com