santosh singh
santosh singhsarkarnama

''मैं जिंदा हूं' असं म्हणणाऱ्या 'मृत' उमेदवाराचा अर्ज रद्द

''ज्या ठिकाणी तुमचा मृत्यू झाला त्याठिकाणी अर्ज भरा. तेथून पुन्हा जिवंत होऊन या,''
Published on

कानपूर : ''तुम्ही जर मृत असाल तर तुमच्याकडं जमिनीची मालकी असू शकत नाही,'' या एका नियमामुळं भारतात अशी अनेक प्रकरणं घडली, ज्यात लोकांची 'मृत' म्हणून नोंद करण्यात आली आणि त्यांची संपत्ती हडपण्यात आली. ज्यांच्याबरोबर हे घडलं त्यांनाही या विरोधात फार काही करता आलं नाही, असाच एक प्रकार नुकताच घडला. त्यामुळे एका 'मृत' उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला.

संतोष मूरत सिंह (santosh singh) हे जिवंत आणि सुदृढ आहेत. पण 'कागदोपत्री' त्यांचा मृत्यू झाल्यानं त्यांना निवडणूक लढविता येत नाही. वीस वर्षापासून जिवंत असल्याचे पुरावे जमा करणारे संतोष मूरत सिंह यांचा उमेदवारी अर्ज (nomination) निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केला. हा प्रकार कानपूर येथे घडला. निवडणूक अधिकाऱ्यांनी संतोष सिंह यांचे कागदपत्र तपासले तेव्हा तेही हैराण झाले. अखेर त्यांनी त्यांचा अर्ज बाद केला. (nomination of dead santosh singh rejected from kanpur)

उमेदवारी अर्ज बाद केल्याचे कारण संतोष यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, ''ज्या ठिकाणी तुमचा मृत्यू झाला त्याठिकाणी अर्ज भरा. तेथून पुन्हा जिवंत होऊन या,'' त्यामुळे आता या 'मृत' उमेदवारांने प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ''ही लोकशाही नाही हे षडयंत्र आहे,''

santosh singh
धक्कादायक : उमेदवारी अर्ज भरताना योगींच्या मंत्र्यावर जीवघेणा हल्ला

वाराणसी येथे राहणारे संतोष सिंह हे वीस वर्षांपासून जिवंत असल्याचा पुरावा शोधत आहे. त्यासाठी ते स्वतःच्या गळ्यात '''मैं जिंदा हूं' अशी पाटी लावून फिरत आहेत. त्यांच्या जीवनावर पंकज त्रिपाठी यांनी ''कागज' हा सिनेमा काढला आहे. हा सिनेमा ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आपण जिवंत असल्याचे सांगण्यासाठी संतोष सिंह यांनी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे उपोषण केले होते. त्यानंतरही ते स्वतःला जिवंत असल्याचे सिद्ध करु शकले नाहीत.

स्वत:ला जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांनी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी महाराजपूर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. संतोष सिंह म्हणतात, ''माझी जमीन हडपण्यासाठी माझ्या गावातील काही जणांनी मला कागदोपत्री मृत दाखविलं आहे,''

santosh singh
नितेश राणे तुरूंगात पुस्तक वाचण्यात दंग? फोटो व्हायरल

यापूर्वी संतोष सिंह यांना यापूर्वीही एका पक्षाकडून उमेदवारी मिळाली होती, तेव्हाही त्यांचा अर्ज बाद करण्यात आला होता, त्यानंतर ते अपक्ष म्हणून अर्ज दाखल करीत आहेत.

यावेळी त्यांनी कानपूरच्या महाराजपूरसिंह विधानसभा मतदार संघातून अपक्ष अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघातून भाजपचे कॅबिनेट मंत्री सतीश महाना निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com