वादग्रस्त भाजप नेत्यांना अजित दोवाल शिकवणार धडा! इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांना दिला शब्द

भाजपच्या प्रवक्त्यांमुळे मोदी सरकार अडचणीत
S Jaishankar, Ajit Doval and Narendra Modi
S Jaishankar, Ajit Doval and Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : प्रेषित महंमद पैगंबर व मुस्लिम धर्म यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भाजपने (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीनकुमार जिंदाल (Naveen Kumar Jindal) यांना निलंबित केले आहे. या प्रकरणी मोदी सरकार तोंडघशी पडले असून, आखाती देशांनी कठोर भूमिका घेतली आहे. या दोघांना धडा शिकवण्यात येईल, असं आश्वासन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांना दिलं आहे. (Ajit Doval News)

इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर-अब्दोल्लाहिया हे भारताच्या दौऱ्यावर आहेत. प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल भाजप नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर यावरून आखाती देशांनी भारताचे कान टोचले होते. यानंतर लगेचच इराणचे परराष्ट्रमंत्री भारतात दाखल झाले आहेत. द्वीपक्षीय संबंधाबाबत ते चर्चा करणार आहेत. आज त्यांनी अजित दोवाल यांनी भेट घेतली. या चर्चेच्या केंद्रस्थानी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते होते. या नेत्यांना धडा शिकवण्याचा शब्द दोवाल यांनी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांना दिला.

S Jaishankar, Ajit Doval and Narendra Modi
पंकजा मुंडेंना डावलताच कार्यकर्ते आक्रमक! थेट भाजप कार्यालयावर धडकले

इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या भेटीनंतर ट्विट केले आहे. या भेटीचा तपशीलही त्यांनी दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आमच्या द्वीपक्षीय चर्चेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर आणि इतर भारतीय अधिकाऱ्यांना भेटून आनंद झाला. भारत आणि इराणने एकमेकांच्या धर्मांचा आदर करण्याची आवश्यकता व्यक्त केली. मुस्लिम धर्माबद्दल वादग्रस्त विधाने करून दुही माजवली जाऊ नये, यावरही भर देण्यात आला आहे. दोन्ही देश द्वीपक्षीय संबंध एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील.

S Jaishankar, Ajit Doval and Narendra Modi
घोडेबाजाराचा आरोप पडला महागात! 'आप'चे प्रभारीच आले अडचणीत

ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर एका खासगी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून मोठा गदारोळ उडाला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरही याचे पडसाद उमटले होते. अखेर भाजपने शर्मांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भाजपने शर्मा यांच्याप्रमाणेच नवीनकुमार जिंदाल यांनाही निलंबित केले आहे. त्यांनी ट्विटवर वादग्रस्त पोस्ट केली होती. दोन्ही नेत्यांमुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com