Lok Sabha Election 2024 : यंदा 96 कोटी मतदार निवडणार आपल्या आवडीचे सरकार

New Voters : नवमतदारांचा टक्का ठरणार पुन्हा निर्णायक
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Festival Of Democracy : लवकरच देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत यंदा 96 कोटी मतदार आपल्या आवडीचे सरकार निवडणार आहे. देशभरात नोंदणीकृत असलेल्या या मतदारांमध्ये 47 कोटी महिला मतदार आहेत. एकूण मतदारांमध्ये तरुणाईचा व नवमतदारांचा टक्का मोठा आहे. याच मतांची संख्या सर्वच राजकीय पक्षांसाठी निर्णायक ठरणार आहे.

गेल्या पाच वर्षात वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांची संख्या देशभरात मोठी आहे. यापैकी निम्म्यावर मतदार प्रथम आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उत्साह दिसत आहे. मतदानासाठी पात्र असलेल्यांपैकी 1.73 कोटी पेक्षा जास्त मतदार 18 ते 19 वयोगटातील आहेत. कोणत्याही परिस्थितीत मतदार चुकवायचे नाही, अशा निश्चय या नवमतदारांनी केला आहे.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : ज्यांनी मोदींचे कान पकडायचे, तेच गाडीत बसण्यासाठी उतावीळ!

18 ते 45 वयोगटातील मतदारांची संख्या सर्वाधिक असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेससह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या वयोगटातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी गेल्या एक वर्षापासून प्रयत्न चालविले आहे. सर्वच राजकीय पक्ष गेल्या वर्षभरापासून रोजगार, शिक्षण, उद्योग आदी विषयांवर चर्चा घडवून आणत आहे. भाजपनेही आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेत देशभरात रोजगार मार्गदर्शन शिबिर, नियुक्ती पत्रांचे वाटप असे उपक्रम राबविले. त्यातून तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तरुणाईच्या पाठोपाठ देशात 47 कोटी महिला मतदार आहेत. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या निम्म्याच्या आसपास आहे. त्यामुळे महिलांचे मतदान कोणाला झुकते माप देते यावरही भाजप, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांचे यश-अपयश अवलंबून राहणार आहे. मध्य प्रदेशात महिलांचे हेच मतदान भाजपसाठी निर्णायक ठरेल होते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात सत्ताधारी भाजपने महिलांसाठी अनेक योजना लागू केल्याचे सांगण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशात 1951 मध्ये 17.32 कोटी नोंदणीकृत मतदार होते. 1957 मध्ये ही संख्या वाढली व मतदारांचा आकडा 19.37 कोटी झाला. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत 91.20 कोटी मतदार होते. मतदार यादीत नोंदणी केलेल्या एकूण मतदारांपैकी सुमारे 18 लाख दिव्यांग मतदार आहेत. देशातील पहिल्या लोकसभा निवडणुकीत 45 टक्के मतदान झाले होते. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 67 होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण भारतात 12 लाखांहून अधिक मतदान केंद्र उभारली जाणार आहेत. निवडणुकीसाठी 1.5 कोटी मतदान कर्मचारी देशभर तैनात केले जाणार आहेत.

Edited By : Prasannaa Jakate

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : मायावतींची वेगळीच खेळी; एनडीए, 'इंडिया'चं गणित बिघडवण्याची तयारी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com