Obaidul Hasan News : बांगलादेशात आंदोलकांसमोर सरन्यायाधीशही हतबल ; ओबैदुल हसन यांना द्यावा लागला राजीनामा!

Bangladesh Chief Justice Obaidul Hassan resign : आंदोलक विद्यार्थ्यांनी आज सर्वोच्च न्यायालयास घेराव घातला होता आणि ओबैदुल हसन यांना राजीनामा देण्यासाठी एक तासाची मुदत दिली होती.
Obaidul Hasan
Obaidul HasanSarkarnama
Published on
Updated on

Bangladesh Violence Update : बांगलादेशात मागील काही दिवसांपासून अराजकता पसरलेली आहे. संपूर्ण जग हे पाहत आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत, केव्हाच देश सोडला आहे. त्यानंतर आता आंदोलकांसमोर बांगलादेशमधील सरसन्यायाधीश ओबैदुल हसन हे देखील हतबल झाले असून त्यांनीही राजीनामा दिला आहे.

आंदोलक विद्यार्थ्यांनी आज सर्वोच्च न्यायालयास घेराव घातला होता आणि ओबैदुल हसन यांना राजीनामा देण्यासाठी एक तासाची मुदत दिली होती. तत्पुर्वी सरन्यायाधीश ओबैदुल हसन यांनी बांगलादेशातील(Bangladesh) अंतिरम सरकारशी चर्चा न करता आज सर्व न्यायाधीशांची एक बैठक बोलावली होती. ज्यास आंदोलकांनी विरोध केला आणि सरन्यायाधीशांनी तत्काळ राजीनामा द्यावा, हे मागणी करत सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात मोठ्या संख्येने गर्दी केली.

Obaidul Hasan
Asaduddin Owaisi on Bangladesh Violence : बांगलादेशात हिंदूंवरील हल्ल्यांवर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

आंदोलकांनी आरोप केला की न्यायालायाचे न्यायधीश हे एका षडयंत्राचा भाग आहेत. विरोध वाढू लागल्याने अखेरी बैठक रद्द करावी लागली. खरंत ओबैदुल हसन यांना मागील वर्षीच सरन्यायाधशी पदी नियुक्त करण्यात आले होते. शिवाय त्यांना माजी पंतप्रधान शेख हसीना(Sheikh Hasina) यांचे निकटवर्तीयही समजले जाते.

Obaidul Hasan
Bangladesh Violence : एअर इंडिया, इंडिगोने ढाकाला विशेष विमानं पाठवून भारतीयांना सुखरुप आणलं मायदेशी!

राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद यूनुस यांना राष्ट्रपती भवन 'बंगभवन' येथे आयोजित एका कार्यक्रमात बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ दिली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com