Video Suraj Suryawanshi : दारुच्या बाटल्या अन् भाजप मंत्र्याचा डान्स; काँग्रेस संतापली, राजीनामाही मागितला

Odisha State Government : दारू पिऊन डान्स करणाऱ्या तरुण नेत्याकडे उच्च शिक्षण मंत्रालय, युवा मंत्रालय आणि क्रीडा, आणि ओडिया भाषा, साहित्य आणि संस्कृती मंत्रालयाची जबाबदारी आहे.
Suraj Suryawanshi
Suraj SuryawanshiSarkarnama

Congress Vs BJP : केंद्रात भाजपने मित्र पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले, तर ओडिशात स्वबळावर सत्ता काबीज केली. आता मंत्रि‍पदाच्या खातेवाटपानंतर भाजपच्या एका मंत्र्याने दारुच्या बाटल्या दाखवत डान्स केल्याचा पुढे येत आहे. मंत्री झाल्यानंतर काही तासांतच दारु पितानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ओडिशातील भाजप सरकारवर जोरदार टीका होत आहे.

ओडिशा सरकारमधील मंत्री सूरज सूर्यवंशी यांनी मित्रांसोबत दारू प्यायली. त्यावेळी त्यांनी डान्सही केला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला. तसेच ओडिशा सरकारवर सडकून टीका केला.

'हे सूर्यवंशी सूरज आहेत. ते ओडिशाच्या भाजप सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांच्याकडे उच्च शिक्षण मंत्रालय, युवा मंत्रालय आणि क्रीडा, आणि ओडिया भाषा, साहित्य आणि संस्कृती मंत्रालयाची जबाबदारी आहे, असा उल्लेख करत श्रीनेत यांनी संबंधित व्हिडिओ पोस्ट केला आहे. यावर भाजपसह काँग्रेसवरही नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे.

ओडिशात नव्याने स्थापन झालेल्या मोहन चरण माझी सरकारमधील सूर्यवंशी सूरज हे सर्वात तरुण मंत्री असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मोहन चरण माझी यांनी 12 जून रोजी ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळी इतर काही मंत्र्यांनाही शपथ देण्यात आली. त्यानंतर झालेल्या खातेवाटपात सूर्यवंशी यांना उच्च शिक्षण, क्रीडा आणि युवा घडामोडी आणि ओडिया भाषा, साहित्य आणि संस्कृती या मंत्रालयांची जबाबदारी देण्यात आली.

Suraj Suryawanshi
Video Chhagan Bhujbal : छगन भुजबळ पंतप्रधान मोदींकडे करणार 'ही' मोठी मागणी

आता त्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ पुढे आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. श्रीनेत यांच्या पोस्टवरवर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर नेटकऱ्यांनी टीका केली. काहींनी सूर्यवंशी मंत्रिपदासाठी योग्य नसल्याचे सांगत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर काहींनी दारू पिण्यात काहीच गैर नसल्याचे सांगत त्यांचा बचावही केला. एकाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा दारुच्या बाटल्यांसह एक फोटो शेअर केला आहे. तर काहींनी श्रीनेत यांनाही लक्ष केले.

Suraj Suryawanshi
Rahul Gandhi : रायबरेली की वायनाड? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे अवघे काही तास; अन्यथा....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com