West Bengal Government News : ओडिशा येथे गेल्या शुक्रवारी झालेल्या रेल्वे अपघातात 275 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अजूनही अनेक प्रवाशी जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये पश्चिम बंगालमधील अनेक व्यक्तींचा समावेश आहे.
या व्यक्तींच्या परिवारांना पश्चिम बंगाल सरकारकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मदत म्हणून देण्यात आलेल्या रकमेत दोन हजारांच्या नोटा असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
या वादात भाजपने उडी घेतली आहे. ममता सरकारवर भाजपने जोरदार हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जीचे सरकार हे संवेदनाहीन सरकार असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे.
दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय आरबीआयने नुकताच घेतला आहे. या नोटा जमा करण्यासाठी ३० सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. या पार्श्वभूमीवर ममतादीदींनी दोन हजारांच्या नोटा दिल्याने भापजनं नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत भाजने व्हिडिओ प्रसिद्ध करीत ममता सरकारच्या कारभारावर भाजप नेता सुकांत मजुमदार यांनी निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये पश्चिम बंगाल सरकारकडून दोन महिलांना दोन हजारांचा नोटा देण्यात येत असल्याचे दिसते.
"मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशानुसार तृणमूल काँग्रेसचे एक राज्यमंत्री पीडीत परिवारांना दोन लाखांची मदत करीत आहेत. आम्ही या मदतीचे कौतुक करतो. पण त्यांना देण्यात येणाऱ्या या दोन हजारांच्या नोटा कुठून आल्या, या नोटा रद्द करण्यात येत असल्याने या गरीब परिावारांच्या अडचणीत वाढ होईल, अशी शंका मजुमदार यांनी उपस्थित केली आहे. "काळ्या पैशाला चलनात आणण्याचा हा प्रयत्न सरकारचा आहे," असा आरोप करण्यात आला आहे.
ओडिशा रेल्वे अपघातात आई-वडील गमावलेल्या मुलांसाठी अदानी समूहाने विशेष पुढाकार घेतला आहे.याबाबत गौतम अदानी यांनी टि्वट करीत ही माहिती दिली. गौतम अदानी यांनी जाहीर केले आहे की, 'ओडिशा रेल्वे अपघातात ज्या निष्पाप लोकांचे पालक गमावले त्यांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह घेणार आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.