Omar Abdullah News : ओमर अब्दुल्लांचं मोठं वक्तव्य!, म्हणाले ''...तर I.N.D.I.A आघाडी संपुष्टात आणली पाहिजे''

Omar Abdullah on I.N.D.I.A Alliance : जाणून घ्या, आणखी नेमकं काय म्हटलं आहे ओमर अब्दुल्ला यांनी I.N.D.I.A Alliance बद्दल? ; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण
Rahul Gandhi, Omar Abdullah
Rahul Gandhi, Omar AbdullahSarkarnama
Published on
Updated on

Omar Abdullah on Congress : विरोधी पक्षाच्या I.N.D.I.A आघाडीत सारकाही आलबेल नाही, हे या आघाडीमधील पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या वक्तव्यांवरून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आता आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटले की, दुर्दैवाने इंडिया आघाडीची कोणतीही बैठक होत नाही. कोणतेही धोरण नाही आणि नेतृत्वही नाही. इंडिया आघाडीच्या अस्तित्वाबाबत कोणतीही स्पष्पटता देखील नाही.

त्यांनी पुढे म्हटले की, जिथपर्यंत मला आठवतं की इंडिया आघाडीसाठी कोणतीही कालमर्यादा नव्हती. जर आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीसाठीच होते, तर इंडिया आघाडीला(INDIA Alliance ) आता संपवलं पाहिजे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. या दरम्यान इंडिया आघाडीतील मित्र पक्ष आम आदमी पार्टी(AAP) आणि काँग्रेसमध्ये एकजुट दिसत नाही. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. पंजाबमध्येही लोकसभा निवडणुकीवेळी दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. यावर अब्दुल्ला यांनी म्हटले की, दिल्लीत काय होत आहे. मी याबद्दल काहीच सांगू शकत नाही. दिल्ली निवडणुकीशी आमचं काही घेणंदेणं नाही. त्यांनी स्पष्टच सांगतितलं की, जर विरोधी पक्षांमध्ये एकजुट नाही तर इंडिया आघाडीला भंग केले पाहिजे.

Rahul Gandhi, Omar Abdullah
Ajit Pawar on Dhananjay Munde : 'पक्ष न बघता दोषींवर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं' ; अजित पवारांचं मोठं विधान!

ममता बॅनर्जी तर आघाडीपासून आधीच अलिप्त झाल्या आहेत. अरविंद केजरीवालही(Arvind kejriwal) आघाडीच्या सोबत दिसत नाहीत. अखिलेश यादव यांनी आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला आहे. तर ममता बॅनर्जींनी या आधीच काँग्रेसच्या ईव्हीएमच्या मुद्य्यावरून काँग्रेसलाच सुनावलेलं आहे. आता उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, ईव्हीएमबाबत रडणं ठीक नाही. विजयी झाले तर सगळं काही चांगलं आणि पराभूत झालं तर ईव्हीएम दोषी ठरवलं जातं.

Rahul Gandhi, Omar Abdullah
Pune BJP News : 'खरी शिवसेना ठाकरेंचीच, शिंदेनी पक्ष चोरला?' - भाजपात आलेल्या माजी नगरसेवकांनी केली भूमिका स्पष्ट, म्हटले...

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस(Congress) आणि नॅशनल कॉन्फरन्सची युती होती. निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अतिशय वाईट होती. काँग्रेस केवळ सहा जागाच जिंकू शकली. तर नॅशनल कॉन्फरन्सने चांगली कामगिरी केली आणि बहुमताने सरकार बनवलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com