मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या 11 राज्यांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. तसंच सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
शुक्रवारी देशातील ‘ओमिक्रॉन’ची रुग्णसंख्या शंभरावर पोहोचली आहे, याबाबात आरोग्य विभागाने चिंता व्यक्त करीत काळजी घेण्याचे आव्हान केले आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रूग्णांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रात आहे असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. त्यात ४० रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. राजधानी दिल्लीत 22 रूग्ण आहेत. तर राजस्थानमध्ये 17 जणांना ओमिक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाली आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
गर्दी, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि नववर्ष स्वागत कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे न करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. जिथे समूह संसर्गाची म्हणजेच कम्युनिटी ट्रांसमिशनची शक्यता आहे अशा ठिकाणी जाणं टाळा. नव्या वर्षाचा उत्सवही साधेपणाने साजरा करावा. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या विरोधात लस प्रभावी ठरत नाही असे कोणत्याही संशोधनातून अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं.
महाराष्ट्रात शुक्रवारी ओमिक्रॉनचे नऊ रुग्ण आढळले. त्यात पुणे जिल्ह्यातील सात रुग्णांचा समावेश आहे. सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील रुग्णांची संख्या आता १४ झाली आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये १०, पुणे ग्रामीणमध्ये सात, पुणे शहर, कल्याण-डोंबिवली आणि उस्मानाबाद येथे प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. बुलढाणा, नागपूर, लातूर आणि वसई-विरार येथे प्रत्येकी एक रुग्ण आहे.
गेल्या २० दिवसांत करोनाची रुग्णसंख्या १० हजारांच्या खाली आहे. देशातील १९ जिल्ह्यांत रुग्ण आढळण्याचा साप्ताहिक दर ५ ते १० टक्के आहे, तर पाच जिल्ह्यांमध्ये हा दर १० टक्क्यांहून अधिक आहे. ८२ कोटी आठ लाख लोकांनी करोना लशीची पहिली मात्रा घेतली आहे. तर ५३ कोटी ७२ लाख नागरिकांनी दुसरीही मात्रा घेतली आहे. देशभर एकूण १३६ लसमात्रा देण्यात आल्या.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नुसार, डेल्टा, डेल्टा प्लस आणि इतर व्हेरिएंटच्या तुलनेपेक्षा ओमिक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरतो आहे. कोरोनाला रोखायचं असेल तर बूस्टर डोस महत्त्वाची भूमिका पार पाडू शकेल. पण हा प्रश्न पाथमिकेतचा आहे. यामुळे मृत्यू होत नाही किंवा आजाराचा धोका तसा कमी आहे तरीही अशा व्हेरिएंटसाठी बूस्टर देणं हा महत्त्वाचा उपाय आहे. मात्र ज्या लोकांना लसीचा पहिला डोसच मिळालेला नाही अशा लोकांचं आयुष्य धोक्यात येऊ शकतं. कारण लसपुरवठा कमी झाल्याने अनेकांना अद्याप पहिला डोसही मिळालेला नाही. ज्यांचा पहिला डोसही झाला नाही अशांसाठी हा व्हेरिएंट धोक्याचा ठरू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.