प्रभा अत्रे, पूनावाला आणि डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर) पद्म पुरस्काराने सन्मानित

Padma Awards 2022 : देशाचे सर्वोच्च नागरी सन्मान आणि त्याचे मानकरी
Prabha Atre - Cyrus Poonawalla-Balaji Tambe
Prabha Atre - Cyrus Poonawalla-Balaji Tambe

दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२२ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यावर्षी देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार ४ जणांना जाहीर झाला आहे. तर पद्मभूषण पुरस्कार १७ जणांना जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय पद्मश्री हा पुरस्कार १०७ जणांना जाहीर झाला आहे.

पद्मविभूषण पुरस्कार -

जेष्ठ गायिका प्रभा आत्रे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर उत्तर प्रदेशचे दिवंगत माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, जनरल बिपिन रावत आणि राधेश्याम खेमका या तिघांनाही मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर करण्यात आला आहे.

पद्मभूषण पुरस्कार -

१. गुलाम नबी आझाद, २. व्हीक्टर बॅनर्जी, ३. गुरमित बावा (मरणोत्तर), ४. बुद्धदेव भट्टाचार्य, ५. नटराजन चंद्रशेखरन, ६. क्रिष्ण इला आणि सुचित्रा इला, ७. मधुर जेफरी, ८. देवेंद्र झांजरीया, ९. राशीद खान, १०. राजीव मेहेरश्री, ११. सुंदरंजन पिचाई, १२. सायरस पुनावाला, १३. संजया राजाराम (मरणोत्तर), १४. प्रतिभा रे, १५. स्वामी सच्चिदानंद, १६. वशिष्ठ त्रिपाठी

पद्मश्री पुरस्कार -

तर एकूण १०७ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे, यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा सन्मान होणार आहे. यात डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर), हिंमतराव बाविस्कर, सुलोचना चव्हाण, डॉ. विजयकुमार डोंगरे, सोनू निगम, अनिलकुमार राजवंशी यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

डाॅ. विजयकुमार डोंगरे यांना कुष्ठरोग निवारणात मोठी कामगिरी केल्याबद्दल सन्मान करण्यात आला आहे. तर आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार आणि उपचार यात अग्रेसर राहिलेले डाॅ. बालाजी तांबे यांनाही (मरणोत्तर) पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. डॉ. तांबे यांनी परदेशातही आयुर्वेदाच्या प्रसारासाठी पुढाकार घेतला होता. `सकाळ`मधील फॅमिली डाॅक्टर या स्वतंत्र पुरवणीत ते नियमित मार्गदर्शन करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाचा हजारो लोकांना लाभ झाला. योग आणि अध्यात्म हे त्यांच्या आवडीचे विषय होते. त्यावरही त्यांनी नियमित लिखाण आणि मार्गदर्शन केले.

सायरस पुनावाला यांच्या पुरस्कारावर जेष्ठ नेते शरद पवार यांची प्रतिक्रिया

यांचा माझा वर्गमित्र सायरस पुनावाला यांस पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिमान वाटत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला. पवार आणि सायरस पूनावाला हे पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात एकत्र होते.

अजून खूप काही करायचं आहे : प्रभा अत्रे

माझे वय आता ९० आहे. हा एवढा मोठा सन्मान मला मिळेल, असे अपेक्षित नव्हते. पण हा सन्मान योग्य वेळी मिळाला, हे माझे नशीब आहे. कलेच्या क्षेत्रातील माझ्या ६० वर्षांच्या सेवेचे हे फळ आहे, असे म्हणता येईल. यामुळे माझ्यापेक्षा माझ्या शिष्या, शिष्य, गुरुजन, माझ्यावर प्रेम करणारे रसिक श्रोते, समीक्षक यांना जास्त आनंद झाला आहे. पुण्यात माझा जन्म झाला, शिक्षण पुण्यात झाले. पुण्याने मला खूप काही दिले आहे. त्यामुळे या शहराचा मला अभिमान आहे. माझ्या कलेवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले आहे. त्याचे मला समाधान आहे. हा सन्मान मिळाला असला तरी माझी कलेची साधना सुरूच राहणार आहे. त्यात अजून खूप काही करायचे आहे. एका शाळेच्या माध्यमातून सामाजिक काम करीत आहे. ते पुढेही सुरूच ठेवणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com