Pahalgam Terrorist Attack : पहलगाम दहशतवादी हल्ला : मोदींनी सौदी अरेबियाहून अमित शहांना लावला फोन अन् दिला 'हा' मोठा आदेश!

Overview of the Pahalgam Terrorist Attack : हल्लेखोर दहशतवाद्यांनी आधी नाव आणि धर्म विचारला आणि मग गोळी मारल्याचे प्रत्यक्षदर्शी पीडित महिलेने सांगितले आहे.
Security personnel conduct operations in Pahalgam following the recent terrorist attack that resulted in multiple casualties.​
Security personnel conduct operations in Pahalgam following the recent terrorist attack that resulted in multiple casualties.​sarkarnama
Published on
Updated on

Pahalgam terrorist attack Update : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशभर खळबळ उडाली आहे. दहशतवाद्याने सापळा रचून पर्यटकांवर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर दहा पेक्षा अधिक पर्यटक जखमी आहेत.

या घटनेनंतर पंतप्रधान मोदी देखील अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहेत. सध्या मोदी सौदी अरेबियाच्या यात्रेवर आहेत. मात्र त्यांनी तिथूनच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला आणि परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या.

Security personnel conduct operations in Pahalgam following the recent terrorist attack that resulted in multiple casualties.​
Jagdeep Dhankhar News : ‘संसदच सर्वोच्च, त्यापेक्षा...’, उपराष्ट्रपती धनखड पुन्हा न्यायालयावर बरसले

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसेच, याप्रकरणी योग्य ती पावलं उचलण्यास सांगितले आहेत. शिवाय, प्रत्यक्ष घटनास्थळी जाण्याचेही निर्देश दिले आहेत.

पंतप्रधानांच्या सूचनेनंतर अमित शाह यांनीही तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली. प्राप्त माहितीनुसार या बैठकीत लष्कर आणि इंटेलिजन्सचे वरिष्ठ अधिकारी देखील हजर राहणार आहेत. बैठकीत दहशतवादी हल्ल्यानंतरची परिस्थिती आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाईल. अमित शाह हे स्वत: श्रीनगरला रवाना होत आहेत.

Security personnel conduct operations in Pahalgam following the recent terrorist attack that resulted in multiple casualties.​
Justice BR Gavai : आमच्यावर आधीच आरोप..! भाजप नेत्यांचं बोलणं खटकलं, भावी सरन्यायाधीश गवईंनी अखेर बोलून दाखवलं...

पहलगाम दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी ठरलेल्या एका पीडित महिलेने एक खळबळजनक विधान केलं आहे. या महिलेने सांगितले आहे की, दहशतवाद्यांनी आधी लोकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारला आणि त्यानंतर त्यांना गोळ्या घातल्या. महिलेने पीसीआरला फोन केला आणि सांगितले की, दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळी मारली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com