Pakistan ceasefire violation : ...शेपूट वाकडं ते वाकडंच! अवघ्या साडेतीन तासांत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

Pakistan violates ceasefire again : संपूर्ण श्रीनगरमध्ये स्फोटाचे आवाज, जाणून घ्या संतप्त झालेल्या मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी यावर काय म्हटलं आहे?
Visuals from the Indian border showing aftermath of Pakistan’s ceasefire violation with heavy shelling and firing reported within 3.5 hours.
Visuals from the Indian border showing aftermath of Pakistan’s ceasefire violation with heavy shelling and firing reported within 3.5 hours. Sarkarnama
Published on
Updated on

Pakistan Violates Ceasefire in Just 3.5 Hours : पाकिस्तानने अवघ्या साडेतीन तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. याद्वारे पाकिस्ताने आपला खरा चेहरा पुन्हा एकदा जगाला दाखवला आहे.  पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर गोळीबार सुरू झाला आहे. श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज येत आहेत. पंजाबमधील फेरोजपूरमध्ये ब्लॅकआउट, जम्मूमधील अनेक भागात पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. पठाणकोटमध्ये सायरन वाजत आहेत. जैसलमैर आणि बारमेडमध्ये ड्रोन दिसत आहेत.

पाकिस्तानने जम्मूभागात गोळीबार सुरू केल्यानंतर आणि श्रीनगरमधील लाल चौकातही स्फोटाचे आवाज येऊ लागल्याने, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी संतप्त ट्वीट केले आहे. हे काय आहे, आताच युद्धबंदी झाली ना?  संपूर्ण श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.

खरंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये आज सांयकाळी पाच वाजेपासून शस्त्रसंधी लागू केली गेली होती. यामुळे आता दोन्ही देशांमध्ये सुरू असलेले हल्ले-प्रतिहल्ले पूर्णपणे थांबतील अशीच सर्वांना अपेक्षा होती. भारतानेही आपल्या अटी आणि शर्तींवर ही शस्त्रसंधी लागू करण्यास तयारी दर्शवली होती. भारताकडून स्पष्ट करण्यात आले होते की, यापुढे जर कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला झाला, तर ते भारताविरोधात युद्ध मानले जाईल आणि त्याला त्यानुसारच प्रत्त्युतर दिलं जाईल.

विशेषम्हणजे भारत आणि पाकिस्तानचे शस्त्रसंधीमध्ये एकमत घडवण्यात अमेरिकेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे समोर आले होते. शस्त्रसंधीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीटद्वारे जगाला माहिती दिली होती. शिवाय पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही शस्त्रसंधीवर पाकिस्तान सहमत असल्याचे कबूल केले होते. मात्र तरीही पाकिस्तानी सैन्याने अवघ्या साडेतीन तासांत आपल्याच देशाला जगासमोर तोंडावर पाडलं. शिवाय, यातून एकप्रकारे ट्रम्प यांनाही धक्का दिल्याचे दिसत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com