Jyoti Malhotra Pakistan spy : ज्योती मल्होत्राच्या हेरगिरीमुळं भारताचं टेन्शन वाढलं; बिहार 'कनेक्शन'मुळे बाबा अजगैवीनाथ धामची सुरक्षा वाढवली

Haryana YouTuber Jyoti Malhotra Bihar Connection Triggers Security Boost at Baba Ajgaivinath Dham : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी हरियानाची यू-ट्यूबर ज्योती मल्होत्राचे बिहार कनेक्शन समोर आलं आहे.
Jyoti Malhotra
Jyoti MalhotraSarkarnama
Published on
Updated on

Jyoti Malhotra Bihar Connection : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी यू-ट्युबर ज्योती मल्होत्रा हिने चौकशीत अनेक गोष्टींचा उलगडा केला. पाकिस्तानच्या ISI संबंधांबरोबर दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याची माहिती दिली. ज्योती मल्होत्राच्या या हेरगिरीमुळे भारताचं टेन्शन वाढलं आहे.

याचबरोबर तिचे बिहार (Bihar) कनेक्शन देखील समोर आलं आहे. ज्योतीच्या यू-ट्यूब चॅनेल ट्रॅव्हल विथ जिओवरून तिचे लोकेशन तपासण्यात येत आहे. पोलिसांनी बाब अजवैगीनाथ धाम मंदिराची सुरक्षा वाढवली आहे. ज्योतीने तिनं व्हिडिओ काढताना, ज्या नागरिकांशी संवाद साधला आहे, त्या स्थानिकांची चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे.

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी यू-ट्युबर ज्योती मल्होत्रा भागलपूरमधील सुलतानगंज इथं चार वेळा येऊन गेली होती, असे पोलिसांच्या (Police) तपासात समोर आलं आहे. याशिवाय ती देवघर आणि बासुकीनाथ इथंही काही काळ वास्तव्यास होती. या काळात तिने कोणाशी संवाद साधला, वारंवार येण्यामागची कारणं काय, या प्रश्नांभोवती पोलिसांचा तपास सुरू आहे.

ज्योती मल्होत्रानं तिथं स्थानिकांशी संवाद साधला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. भागलपूरमधील नागरिकांचे यापूर्वीही पाक कनेक्शन समोर आलं आहे. त्यामुळे त्याचा काही संबंध आहे का, याचा देखील पोलिस तपास करत आहेत.

Jyoti Malhotra
Prakash Ambedkar On Sharad Pawar : 'शरद पवार भाजपमय झालेत'; भीमा कोरेगाव दंगलीच्या पत्रव्यवहाराचा संदर्भ देत आंबेडकरांचा निशाणा (VIDEO)

ज्योतीने काढलेल्या व्हिडिओची तपासणी

ज्योतीने मल्होत्रा हिने 2023 ते 2024 या कालावधीत सुलतानगंजला भेट दिल्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. यात तिने आपल्या प्रेक्षकांना सुलतानगंजपासून देवघरपर्यंत कावड यात्रा देखील दाखवली होती. ज्योती एवढ्यावरच थांबली नव्हती. सुलतानगंज घाट, बाजार आणि रेस्टाॅरंटच्या आसपास फिरतानांचे व्हिडिओ देखील केले आहेत. या व्हिडिओत ज्योतीने ज्या नागरिकांशी संवाद साधला त्यांची माहिती पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली आहे.

Jyoti Malhotra
Mohammad Yunus : बांगलादेशात पुन्हा काहीतरी मोठं घडणार? ; मोहम्मद युनूस यांच्या अडचणीत वाढ!

अजगैवीनाथ धामची सुरक्षा वाढवली

ज्योतीचा भागलपूरमधील सुलतानगंजमधील व्हिडिओ समोर येताच भागपूरचे अतिरीक्त पोलिस अधीक्षक हृदयकांत यांनी स्थानिक पोलिसांचे एक पथक तयार करून, तपास सुरू केला आहे. याशिवाय पथकाने अजगैवीनाथ धाम मंदिराची सुरक्षा व्यवस्थेचे आॅडिट करत, त्यात वाढ केली आहे. सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहे. सुरक्षा व्यवस्थेत काही सुधारणा देखील केल्या जात आहेत.

ज्योती सुलतानगंजमधील मशि‍दीला भेट

ज्योतीने या भागात ज्या गावांमध्ये व्हिडिओ केले, तिथल्या हालचालींवर देखील लक्ष ठेवले जात आहे. नेपाळ, गुवाहाटी रस्त्याने की रेसल्वे मार्गाने ज्योतीने प्रवास केला, याचा शोध आता पोलिस घेत आहे. ज्योती सुलतानगंजमधील वास्तव्यादरम्यान एका हाॅटेलमध्ये राहिली होती. त्याशिवाय तिथल्या एका मशिदीत देखील गेली होती. यावेळी तिच्याबरोबर एक स्थानिक यू-ट्यूबर देखील होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com