Modi on US Tour : भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी काही करारांवर काम करत आहेत. दरम्यान, अमेरिकेने भारताला मैत्री आणि धोरणात्मक भागीदारीची अतुलनीय अशी सखोलता दिली. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात अमेरिकेला भेट देणार आहेत.
त्यानंतर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन सप्टेंबरमध्ये G20 शिखर परिषदेसाठी भारतात येणार आहेत. त्यावेळी दोन्ही देशातील मैत्रिपूर्ण संबध दृढ होतील. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या आताच्या दौऱ्याबाबत अमेरिका उत्सुक आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी व्यक्त केले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
पुढील महिन्यात पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौरा नियोजित आहे. त्यावर गार्सेटी म्हणाले, "जूनमध्ये ज्यो बायडेन यांच्या निमंत्रणावरून जूनमध्ये पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन 22 जून रोजी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करतील. अमेरिका या दौऱ्याबद्दल खूर उत्सुक आहे. अमेरिका भारतासोबत संरक्षण, व्यापार आणि गुंतवणूक, हवामान बदल आणि लोकांशी संपर्क या क्षेत्रांमध्ये संबंध अधिक दृढ करण्याचा विचार करत आहे." (India News)
चीनकडून भू सीमेसह सागरी क्षेत्रात भारताला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यावर गार्सेटी म्हणाले की, "भारत सीमा, सार्वभौमत्व आणि कायद्याच्या राज्याचा आदर करते. त्यामुळे या प्रश्नांवर भारत अमेरिकेवर अवलंबून राहू शकतो. आम्ही या तत्त्वांचे रक्षण करू. एखाद्या देशाला असे वाटत असेल की तो एकतर्फी स्थिती बदलू शकतो, तर ते आपल्या सर्वांना अस्वीकार्य आहे. आम्हाला कारवाई टाळायची आहे. चीन आणि भारतातील संबंध अधिक शांततापूर्ण असावेत, अशीच आमची इच्छा आहे. दरम्यान, पाकिस्तानची गुंडगिरीही खपवून घेणार नाही."
अमेरिका आणि भारतातील भागीदारी केवळ दोन देशांसाठीच नाही तर जगासाठीही फायदेशीर असल्याचा दावा गार्सेटी यांनी यावेळी केला. ते म्हणाले, "पंतप्रधानांच्या दौऱ्यातीव झालेले करारांकडे जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिका अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली आणि तंत्रज्ञान हस्तांतरणही देत आहे. त्यामुळे भारतात काही गोष्टींची निर्मिती शक्य होणार आहे. अमेरिकेने मित्रराष्ट्रांचे कायम हित पाहिले आहे. भारताला अमेरिकेने मैत्रीची खोली आणि धोरणात्मक भागीदारी दिली ती जगातील इतरांपेक्षा वेगळी आहे."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.