
Imran Khan In Islamabad High Court: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चे अध्यक्ष इम्रान खान यांना इस्लामाबाद न्यायालयाने 8 दिवसांची कोठडी सुनावली आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात इम्रान खान यांना मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून अटक करण्यात आली होती.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून इम्रान खान अटक करण्यात आल्यानंतर त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने इम्रान खान यांची 14 दिवसांची कोठडी मागितली होती. पण न्यायालयाने 8 दिवसांसाठी कोठडी सुनावली.
दरम्यान, यावेळी इम्रान खान यांनी न्यायालयात खळबळजनक दावा केला असून त्यांच्या हत्येची भीती व्यक्त केली आहे. माझ्या हत्येचा कट रचला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये सध्या अनेक शहरात तणावाचे वातावरण आहे. तर अनेक शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
(Edited By- Ganesh Thombare)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.