मुंबई : जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या पनामा पेपर्स (Panama Papers) लीक प्रकरणानंतर आता पुन्हा एका पेपर्स लीक प्रकरणाने जगभरातील श्रीमंतांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. जगातील 117 देशांच्या 600 पत्रकारांनी केलेल्या शोध मोहिमेत पँडोरा पेपर्स (Pandora Papers) मधून जगभरातील श्रीमंतांनी संपूर्ण करमाफी असलेल्या देशांत केलेली गुंतवणूक उघड झाली आहे. यात आता भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सचिन तेंडुलकरसह जगातील अनेक सेलिब्रिटींनी आणि श्रीमंतांनी संपूर्ण करमाफी असलेल्या देशांत गुप्त गुंतवणूक केली असल्याचा दावा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर वाचविण्यासाठी श्रीमंत भारतीयांनी परदेशात कोट्यवधींची गुप्त गुंतवणूक केली आहे. या लिस्टमध्ये प्रसिद्ध उद्योगपती आणि विविध क्षेत्रातील धनाड्यांची नावे ‘पँडोरा पेपर्स’मध्ये समाविष्ट आहेत. अनेक धनाढ्य भारतीयांनी कर वाचवण्यासाठी परदेशात अवैधरित्या गुंतवणूक केल्याची माहिती पनामा पेपर्स लीक प्रकरणामुळे समोर आली होती. या प्रकरणानंतर त्यांनी ही संपत्ती विकण्याचे किंवा दुसरीकडे गुंतवणूक करण्याच्या हालचाली सुरु केल्या. यांच्याच सचिन तेंडुलकरचेही नाव पुढे आले आहे.
पँडोरा पेपर्समधील माहितीनुसार, संपूर्ण करमाफी असलेल्या देशांत जगातील अनेक राजकारण्यांनीही कर वाचवण्यासाठी गुंतवणूक केली आहे. या यादीत भारतातील सहा, तर पाकिस्तानमधील सात राजकारण्यांचा समावेश आहे. यांच्याशिवाय, महसूल खात्याचे माजी अधिकारी, आयकर खात्याचे माजी आयुक्त आणि माजी सैन्याधिकाऱ्यांनीही परदेशात गुंतवणूक केली आहे. तर दूसरीकडे, सचिन तेंडुलकर यांची सर्व गुंतवणूक वैध मार्गाने केली असून आयकर विभागाला याविषयी माहिती देण्यात आली होती, असे स्पष्टीकरण सचिन तेंडूलकरचे वकीलांनी दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.