Budget Session 2023 : खर्गेंची शेरो-शायरी, सभापतींच्या 'त्या' विधानावर मोदी हसले...; Video पाहा

Budget Session 2023 : खर्गे यांनी 40 मिनिटांचे भाषण केले. या दरम्यान खर्गे यांनी सभापती जगदीश धनखड यांचीही फिरकी घेतली.
Budget Session 2023 : खर्गेंची शेरो-शायरी, सभापतींच्या 'त्या' विधानावर मोदी हसले...; Video पाहा
Published on
Updated on

Budget Session 2023 News update : अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी अदानी समूहाच्या विषयांवर गाजला. काँग्रेसने अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मोदी सरकारला घेरलं. काल (मंगळवारी) खासदार राहुल गांधी यांनी मोदींवर निशाना साधला होता, आज काँग्रेसचे अध्यक्ष मलिक्कार्जुन खर्गे यांनी या विषयावरुन सभागृह गाजवलं. या गंभीर वातावरणात एकमेकांची फिरकी घेताना आनंदाचे फवारे उडाले.

यावेळी खर्गे यांनी 40 मिनिटांचे भाषण केले. या दरम्यान खर्गे यांनी सभापती जगदीश धनखड यांचीही फिरकी घेतली. अदानी- मोदींचे नाते, अदानींनी झपाट्याने वाढलेलेी संपत्ती, त्यांच्या कंपन्या यावर मोदी सरकारला जाब विचारला. मोदी-शहांच्या वॉशिंग मशिनचा, हरिश्चंद्राचा उल्लेख करीत खर्गेंनी एक शेर ऐकवला, तेव्हा सभागृहातील वातावरण शायराना झाले.

खर्गे म्हणाले, "जेपीसी तयार करा. सभापतीजी हे खूप चांगले वकील आहेत. मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. तुम्ही मला सांगितले होते की सुरुवातीला मी हाताने पैसे मोजायचो. मग मशीनमधून पैसे मोजायला सुरुवात केली. यावर सभापती म्हणाले, 'वकिलीची गोष्ट ऑथेंटिकेट करण्याची गरज नाही. मी हात जोडतो, मी मशीनमधून पैसे मोजण्याबद्दल बोललो नव्हतो. तुम्ही माझ्यावरही जेपीसी बसवणार असे दिसते. असे बोलताच सभागृहात हशा पिकला. मोदींनाही हसू आवरता आले नाही. अदानी समुह विषयावर गंभीर झालेल्या सभागृहात सभापतींच्या उत्तराने हास्याच्या फवारात रमले.

काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, “यात्रेत चालत असताना तरुणांनी विचारलं की, अदाणी यांच्यासारखं स्टार्टअप सुरु करायचं आहे. कारण, अदाणी ज्या व्यवसायाला हात लावतात, तो यशस्वी होतो. लोकं विचारायचं की, अदाणी कसं काय अनेक क्षेत्रांत पुढं जात आहेत. काही वर्षापूर्वी अदानींचे फक्त एक-दोन व्यवसाय होते.आता,आठ ते दहा व्यवसाय आहेत.” त्यानंतर महुआ मोइत्रा यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.

अदानी यांनी देशाला फसवलं असल्याचा आरोप यावेळी महुआ यांनी केले आहे. त्यांनी अदानी यांचे अप्रत्यक्षपणे नाव घेत मोदी सरकारचे त्यांच्याशी असलेले हितसंबध यावर जोरदार प्रहार केला. यावेळी त्यांनी काही अपशब्द वापरले, यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी महुआ यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com