Jagdeep Dhankhad ON Malliakarjun Kharge : 'माझ्या लग्नाला 45 वर्षे झालीत, मला कधीच राग येत नाही' ; असे जगदीप धनखड का म्हणाले..

Parliament News : खासदारांना हसू आवरता आले नाही.
Jagdeep Dhankhar
Jagdeep DhankharSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : राज्यसभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राज्यसभेचे जगदीप धनखड यांच्यात झालेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जगदीप धनखड यांनी मल्लिकार्जून खर्गे यांना दोन सेंकद बोलून बसायला सांगितले. यावर खर्गे यांनी जगदीप धनखड यांना विचारले की तुम्ही का रागावला आहात का? यावर धनखड यांनी दिलेल्या उत्तराने सभागृहात हशा पिकला.

यावर अध्यक्ष धनखड म्हणाले, "सर (खर्गे), मी ४५ वर्षांपासून विवाहित आहे. मला कधीच राग येत नाही.’ या त्यांच्या उत्तराने सभागृहात उपस्थित खासदारांना हसू आवरता आले नाही.

धनखड यांनी पत्नी ही सभागृहाची सदस्य नसल्याचे सांगत खर्गें म्हणाले, "पत्नी सदनाची सदस्य नसल्याने तुम्ही सभागृहात चर्चा करू शकत नाही. खर्गेंना आपला राग दूर करण्याची विनंती करताना म्हटले की, तुम्ही राग दाखवत नाही, तर आतून करता. धनखड यांच्या या विधानाने सभागृहात पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडाले.

Jagdeep Dhankhar
Swabhimani Shetkari Saghtana: राजू शेट्टींचं टेन्शन वाढलं; अनेक शेतकरी नेते बीआरएसच्या गळाला..

राज्यसभेत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांमध्ये मणिपूरच्या हिंसाचारावरुन गदारोळ सुरू असताना हा प्रकार घडला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत येऊन मणिपूर मुद्दावर येऊन बोलावे, अशी मागणी विरोधी पक्षाकडून होत आहे. तर दुसरीकडे मणिपूर मुद्दावर गृहमंत्री अमित शाह बोलणार या भूमिकेवर ठाम आहेत.

काल (गुरुवारी) दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगच्या अधिकाराशी संबंधित असलेले 'दिल्ली सेवा बिल' लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाल्याने केजरीवाल सरकारला मोठा धक्का बसला आहे. आज हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com