Parliament Security Breach : धक्कादायक!, लोकसभेची सुरक्षा भेदली, दोन तरुण लोकसभेत घुसले

Parliament Winter Session 2023 : प्रेक्षक गॅलरीतून खासदारांच्या डेस्कवर दोघांच्या उड्या, स्मोक कँडल जाळण्याचा प्रयत्न
Parliament
ParliamentSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Security Breach : लोकसभेत बुधवारी दुपारी धक्कादायक घटना घडली. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलेरीत बसलेल्यापैकी दोघांनी थेट खासदार बसलेल्या ठिकाणी उडी मारली. तसेच स्मोक कँडल जाळल्या. त्यामुळे एकच घबराट निर्माण झाली.

उडी मारणाऱ्यांपैकी एकाने खासदारांच्या डेस्क वरून लोकसभा अध्यक्षांच्या आसानाकडे जाण्याच्या प्रयत्न केला. विशेष म्हणजे आजच्या दिवशी २२ वर्षांपूर्वी संसदेवर अतिरेकी हल्ला करण्यात आला होता.

संसेदच्या नव्या वास्तूमध्ये सुरू असलेले हे दुसरेच अधिवेशन आहे. राजेंद्र आगरवाल यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहात होते. लोकसभेत कामकाज सुरू असताना अचानकपणे दोघांनी उड्या मारून तिथे प्रवेश केल्यामुळे एकच गोंधळ उडाला.

तातडीने सुरक्षारक्षकांनी या सर्वांना घेराव घालून त्यांना ताब्यात घेतले. समोर सुरू असलेला हा प्रकार बघताच पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले.

लोकसभेची सुरक्षा भेदणाऱ्यांमध्ये मराठी तरुणाचा समावेश आहे. अमोल शिंदे असे या तरुणाचे नाव आहे.अमोल हा लातुर जिल्ह्यातील आहे. अमोल सोबत असलेल्या दुसऱ्या तरुणाचे नाव सागर असे आहे.

या तरुणांसोबत ४० वर्षीय नीलम कौर नावाची महिला देखील होती. स्मोक स्कँडल जाळल्यानंतर या तरुणांनी ताणाशाही नही चलेगी, असा घोषणा दिल्या.म्हैसूरचे खासदार प्रताप सिंग यांच्या मार्फत घुसखोरी करणाऱ्यांना पास देण्यात आल्याची माहिती आहे.

घुसखोरांनी जे स्मोक स्कँडल जाळले त्यामुळे खासदारांना त्रास झाला. स्मोक स्कँडलच्या धुऱ्यामुळे डोळे चुरचुरत असल्याचे खासदारांनी सांगितले.

घुसखोरांना पकडण्यासाठी खासदारांनीच पुढाकारा घेतला. खासदारांनी पकडून उडी मारणाऱ्या तरुणाला सुरक्षारक्षकांच्या हवाली केली. लोकसभा अध्यक्षांनी दुपारी दोनपर्यंत कामकाज स्थगित केली होती.

कामकाज पुन्हा सुरु होताचा खासदारांनी सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. तरुणांनी सुरक्षा भेदून स्मोक स्कँडल कसे आणले यावर प्रश्न उपस्थित केला गेला. उडी मारणाऱ्या तरुणाने बुटामध्ये स्मोकस्कँडल लपून आणल्याची माहिती समोर येत आहे.

राजेंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, दोन व्यक्ती प्रेक्षक गॅलेरीतून खाली पडले. जाणीव पूर्वक त्यांनी उडी मारल्याचे लगेच लक्ष्यात आले. एक सदस्य लोकसभा अध्यक्षांच्या आसनाकडे खासदारांच्या डेस्कवरून उड्या मारून जात होता.

खासदार डिंपल यादव यांनी सांगितले की, ही पूर्णपणे सुरक्षेतील चूक आहे. आज संसदेत मोठी घटना घडू शकली असती. तर, काँग्रेस खासदार अधिरंजन चौधरी म्हणाले, दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलेरीतून उड्या मारल्या. त्यांनी काही तरी फेकले ज्यातून धूर निघत होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com